- ऋजुता लुकतुके
भारताचा टेनिसपटू (tennis player) सुमित नागलने (Sumit Nagal) सोमवारी कारकीर्दीतील पहिला मास्टर्स मेन ड्रॉ विजय मिळवताना जागतिक क्रमवारीतील ३८ व्या क्रमांकावरील मॅटिओ अरनाल्डीचा पराभव केला. माँटे कार्लोमध्ये सुरु असलेल्या स्पर्घेत नागलने अरनाल्डीला तीन सेटमध्ये कडवी झुंज दिली. आणि अखेर ५-७, ६-२ आणि ६-४ असा विजय मिळवला. पहिला सेट गमावल्यानंतर सुमितने खेळात बदल करत हा विजय मिळवला. आता त्याची गाठ डेन्मार्कच्या रुनशी पडणार आहे. रुन जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. (Sumit Nagal)
(हेही वाचा- IPL 2024, Virat Kohli : स्ट्राइक रेटमुळे ट्रोल झालेल्या विराटला ब्रायन लाराचा पाठिंबा )
२६ वर्षीय सुमित नागल (Sumit Nagal) यंदाच्या हंगामात फॉर्ममध्ये आहे. आणि तिसऱ्यांदा त्याने जागतिक क्रमवारीत ५० च्या आत असलेल्या खेळाडूला पराभूत केलं आहे. ऑस्ट्रेलियन (Australian) ओपनमध्ये त्याने अलेक्झांडर बिबलिकचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला होता. तर तर अर्जेंटिना ओपन स्पर्धेत त्याने ख्रिस्टियन गेरिनचा पराभव केला. हे दोन्ही खेळाडू जागतिक क्रमवारीत अनुक्रमे २७ आणि २२ व्या क्रमांकावर होते. (Sumit Nagal)
There’s just Sumit about Nagal on clay 🧱
History for @nagalsumit as he becomes the first-ever male Indian singles player to win a Masters 1000 match on clay!#RolexMonteCarloMasters pic.twitter.com/zJGfMunJlN
— Tennis TV (@TennisTV) April 8, 2024
मास्टर्स स्पर्धेच्या मुख्य ड्रॉसाठी तो पात्र ठरला तेव्हाच जागतिक क्रमवारीत ८० वं स्थान त्याने पक्कं केलं होतं. सुमितचं हे आतापर्यंतचं सर्वोत्तम रँकिंग असेल. आणि एटीपी मास्टर्स (ATP Masters) स्पर्धेत एखादी फेरी जिंकणारा तो पहिला भारतीय टेनिसपटू ठरला आहे. पहिल्या सेटमध्ये दोघांनीही सुरुवातीलाच एक एकेकदा प्रतिस्पर्ध्याच्या सर्व्हिस भेदल्या होत्या. पण, सुमित ५-६ वर सर्व्हिस करत असताना त्याला हा गेम राखणं शक्य झालं नाही. आणि पहिला सेट त्याने ५-७ ने गमावला. पण, याचा परिणाम त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये होऊ दिला नाही. (Sumit Nagal)
(हेही वाचा- नाराज Congress सांगलीत उबाठाच्या उमेदवाराला पाडणार?)
दुसऱ्या सेटमध्ये त्याने दोनदा अरनाल्डीची सर्व्हिस भेदली. आणि तिसऱ्या सेटमध्येही सुरुवातीलाच ४-३ अशी आघाडी घेत त्याने सामना आपल्या बाजूने वळवला. महत्त्वाचं म्हणजे ही आघाडी त्याने शेवटपर्यंत राखली. या स्पर्धेच्या पात्रता फेरीतही सुमितने जागतिक क्रमवारीतील ६० व्या आणि ५५ व्या क्रमांकांवरील खेळाडूंना हरवलं होतं. त्यामुळेच स्वत: नागल आता क्रमवारीत पहिल्या ८० खेळाडूंत येणार आहे. (Sumit Nagal)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community