-
ऋजुता लुकतुके
भारतीय फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) ४० व्या वर्षी आपल्या निवृत्तीचा निर्णय काही सामन्यांपुरता मागे घेतला आहे. फिफाच्या काही मैत्रीपूर्ण लढती तो राष्ट्रीय संघासाठी खेळणार आहे. मागची जवळ जवळ १० वर्षं तो भारतीय संघाचा कर्णधार होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर थोडीफार ओळख असलेला तो भारताचा एकमेव फुटबॉलपटू होता. आता भारतीय संघाला पाठिंबा म्हणून त्याने काही काळासाठी निवृत्ती मागे घेतली आहे.
भारतीय फुटबॉल फेडरेशनलाही या निर्णयामुळे दिलासा मिळालेला दिसतोय. कारण, ‘सुनील छेत्री (Sunil Chhetri) परतलाय! कर्णधार, नेता आणि दिग्गज खेळाडू छेत्री राष्ट्रीय संघात खेळताना पुन्हा एकदा दिसणार आहे,’ असा संदेश फुटबॉल संघटनेनं आपल्या ट्विटर हँडलवर दिला आहे. छेत्रीनंतर भारताकडे लालियनझुला छांगते हा युवा फॉरवर्ड संघात आहे. पण, त्याची म्हणावी तशी छाप अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर पडलेली नाही.
(हेही वाचा – Xiaomi 15 & Xiaomi 15 Ultra : शिओमी १५ मालिकेतील दोन नवीन फोन जागतिक बाजारपेठेत दाखल)
𝐒𝐔𝐍𝐈𝐋 𝐂𝐇𝐇𝐄𝐓𝐑𝐈 𝐈𝐒 𝐁𝐀𝐂𝐊. 🇮🇳
The captain, leader, legend will return to the Indian national team for the FIFA International Window in March.#IndianFootball ⚽ pic.twitter.com/vzSQo0Ctez
— Indian Football Team (@IndianFootball) March 6, 2025
(हेही वाचा – Sameer Wankhede यांची बदली रद्द ; ‘कॅट’चा निर्णय)
सुनील छेत्री (Sunil Chhetri) २००५ साली पहिल्यांदा भारतीय फुटबॉल संघात खेळला. आणि तेव्हापासून तो भारताकडून सर्वाधिक सामने खेळलेला तसंच सर्वाधिक गोल नावावर असलेला खेळाडू आहे. गेल्यावर्षी त्याने निवृत्ती जाहीर केली. पण, आता फिफाचे काही सामने मार्च महिन्यात होणार असल्यामुळे छेत्रीने संघाची गरज ओळखून पुन्हा खेळण्याचा निर्णय घेतला आहे. छेत्रीच्या नावावर ९४ आंतरराष्ट्रीय गोल आहेत. २०२४ मध्ये त्याने निवृत्ती पत्करली तेव्हा फिफा संघटनेनही त्याला मानवंदना देताना त्याच्यावर एक सविस्तर डॉक्युमेंटरी सादर केली होती. छेत्रीची निवृत्ती हा तेव्हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये चर्चिला गेलेला विषय ठरला होता. कारण, ३९ व्या वर्षीपर्यंत तो राष्ट्रीय संघात खेळत होता. ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo), लायनेल मेस्सी (Lionel Messi) आणि अली दाई (Ali Daei) यांच्याखालोखाल सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम छेत्रीच्या (Sunil Chhetri) नावावर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community