Sunil Chhetri on Retirement : अव्वल फुटबॉलपटू सुनील छेत्रीने दिले निवृत्तीचे संकेत, पण निश्चित वेळ ठरवलेली नाही

आपण कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेलं ३९ वर्षीय सुनील छेत्रीने मान्य केलं. पण, नेमकं कधी निवृत्त होणार हे ठरवलेलं नाही.

192
Sunil Chhetri on Retirement : अव्वल फुटबॉलपटू सुनील छेत्रीने दिले निवृत्तीचे संकेत, पण निश्चित वेळ ठरवलेली नाही
Sunil Chhetri on Retirement : अव्वल फुटबॉलपटू सुनील छेत्रीने दिले निवृत्तीचे संकेत, पण निश्चित वेळ ठरवलेली नाही
  • ऋजुता लुकतुके

आपण कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेलं ३९ वर्षीय सुनील छेत्रीने मान्य केलं. पण, नेमकं कधी निवृत्त होणार हे ठरवलेलं नाही. (Sunil Chhetri on Retirement)

भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आपण कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचं मान्य केलं आहे. पण, नेमकी निवृत्तीची वेळ जाहीर केलेली नाही. अर्थात. २०२६च्या फिफा विश्वचषकापर्यंत तो नसेल, असंही त्याने म्हटलं आहे. (Sunil Chhetri on Retirement)

‘मी आता जिथे आहे, तिथेच समाधानी आहे. ही वेळ आणि जागा मला आनंद देतेय. आता पुढे काय करायचं, कधी निवृत्त व्हायचं हे मी अजून ठरवलेलं नाही,’ असं छेत्री एका खाजगी कार्यक्रमात बोलताना म्हणाला. या महिन्याच्या शेवटी फिफा विश्वचषक २०२६ साठीच्या पात्रता स्पर्धेची दुसरी फेरी पार पडणार आहे आणि भारतीय संघ यात सहभागी होईल तो छेत्रीच्याच नेतृत्वाखाली. (Sunil Chhetri on Retirement)

त्याविषयीच ३९ वर्षीय सुनील छेत्री बोलत होता. ‘माझी काही दीर्घकालीन उद्दिष्टं नाहीत. मी पुढच्या ३ महिन्यांचा विचार करायचं ठरवलंय. ती झाली की पुढचे ३ महिने आणि मग असं करत करत कधी थांबायचं ते मी ठरवेन,’ असं छेत्रीने फिफा डॉट कॉम या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. (Sunil Chhetri on Retirement)

(हेही वाचा – OBC Reservation : OBC आरक्षणाच्या याचिकेच्या सुनावणीला छगन भुजबळ उपस्थित राहणार; काय आहे याचिका?)

भारतीय संघाचा समावेश अ गटात झाला आहे आणि या गटात भारताबरोबरच कतार, अफगाणिस्तान आणि कुवेत हे संघ आहेत. भारताचा पहिला सामना कुवेतशी कुवेतमध्ये येत्या १६ नोव्हेंबरला होणार आहे. तर पुढील सामना २१ नोव्हेंबरला भुवनेश्वर इथं होईल. (Sunil Chhetri on Retirement)

असे नऊ गट सध्या आहेत आणि प्रत्येक गटातील पहिले दोन संघ पुढील म्हणजे तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. या अठरा संघाची आणखी एक स्पर्धा पुढील टप्प्यात होईल. त्यासाठी हे अठरा संघ तीन गटांमध्ये विभागले जातील आणि या तीन गटांमधील अव्वल दोन संघ फिफा २०२६ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. या पात्रता स्पर्धांमध्ये सुनील छेत्री खेळणार आहे. (Sunil Chhetri on Retirement)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.