-
ऋजुता लुकतुके
मालदीव (Maldives) विरुद्धच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत भारताने मालदीवचा ३-० असा पराभव केला. माजी कर्णधार सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) या सामन्यात निवृत्ती बाजूला ठेवून आंतरराष्ट्रीय पुनरागमन केलं होतं. आणि एक गोल करून त्याने ते सार्थकी लावलं. छेत्रीने सामन्यात भारताचं नेतृत्वही केलं. त्याच्या मैदानातील वावरामुळेही संघात फरक पडलेला दिसला. आणि भारतीय फुटबॉल संघाने आपली १२ पराभव आणि बरोबरींची मालिका या खंडित केली.
३५ व्या मिनिटाला राहुल भेकेनं (Rahul Bheke) भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर लिस्टन कोलेकोनं (Liston Colaco) ६६ व्या मिनिटाला दुसरा गोल करत आघाडी आणखी वाढवली. मध्यंतरालाच भारतीय संघ २-० ने आघाडीवर होता. मध्यंतरानंतर काही वेळातच ७७ व्या मिनिटाला छेत्रीने (Sunil Chhetri) आपला कारकीर्दीतीतल ९५ वा आंतरराष्ट्रीय गोल केला. ४७ व्या मिनिटाला छेत्रीकडे गोल करण्याची एक संधी चालून आली होती. पण, तेव्हा छेत्रीचा फटका मालदीवच्या गोलीने अडवला. ती कसर पुढे त्याने भरून काढली. गोल झाल्यानंतर छेत्री (Sunil Chhetri) काही काळ मैदानातच भावनाविवश झाला होता. खासकरून या गोलनंतर पाचच मिनिटात त्याच्याऐवजी बदली खेळाडू मैदानात उतरला. आणि मैदान सोडताना छेत्रीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
(हेही वाचा – ‘ट्रेड सर्टिफिकेट’ न केलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवा; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांचे आदेश)
— flw @canbesagnik (@maybesagnikk) March 19, 2025
मागच्या सोळा महिन्यात भारतीय संघाने मिळलेला हा पहिला आंतराष्ट्रीय विजय आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात भारतीय फुटबॉलची धुरा मुख्य प्रशिक्षक म्हणून मोलेनो मार्केझ यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर सततच्या पराभवांनंतर भारतीय संघटनेनं सुनील छेत्रीला (Sunil Chhetri) निवृत्तीतून बाहेर येण्याची विनंती केली. छेत्रीने काही मैत्रीपूर्ण सामन्यांबरोबरच फिफाचे पात्रता सामने खेळायला मान्यता दिली. आणि मालदीविरुद्ध छेत्री खेळला. त्याचा प्रभावही सामन्यात दिसला. भारतीय संघाला आता एएफसी आशिया चषकाच्या (AFC Asia Cup) पात्रता फेरीत खेळायचं आहे. २५ मार्चला बांगलादेश विरुद्ध हा महत्त्वाचा सामना होणार आहे. आणि त्यासाठीच छेत्रीने निवृत्ती मागे घेतली आहे. त्या सामन्यापूर्वी भारतीय संघ तयारीच्या दृष्टीने मालदीवविरुद्घचा सामन्याकडे बघत होता.
आंतरराष्ट्रीय फिफा क्रमवारीत भारत १३६ तर मालदीव (Maldives) १६२ व्या क्रमांकावर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community