माजी भारतीय सुप्रसिद्ध फलंदाज सुरेश रैनाने आपल्या आयुष्यातील एका नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. नुकताच त्याने आपल्या सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. या इनिंगमध्ये रैना स्वयंपाकघरात आपली फटकेबाजी करतांना दिसणार आहे. सुरेश रैनाने स्वःताचे रेस्टॉरेंट उघडले आहे. मिस्टर आयपीएलने नेदरलँड्समधील अॅमस्टरडॅममध्ये ‘रैना’ नामक इंडियन रेस्टॉरेंट सुरु केले असून तिथे तो देशी खाद्यपदार्थांची चव सर्व खवय्यांना चाखायला देणार आहे. रैनाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अनेक फोटो शेअर करून आपल्या नव्या इनिंगची माहिती दिली आहे.
(हेही वाचा – भारत-यूएस ‘हाय-टेक हँडशेक’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा सहभाग)
सुरेश रैनाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “अॅमस्टरडॅममधील रैना इंडियन रेस्टॉरंटची ओळख करून देताना मला खूप आनंद होत आहे. जिथे माझी खाण्याची आणि स्वयंपाकाची आवड मी अधिक जोपासू शकतो. सर्वोत्कृष्ट पदार्थ तयार करून लोकांना खाऊ घालता येतील हा माझ्यासाठी खूप विलक्षण अनुभव असणार आहे. गेल्या काही वर्षांत तुम्ही माझे खाण्याबद्दलचे प्रेम पाहिले आहे आणि माझ्या स्वयंपाकासंबंधी साहसांचे कौतुकही केले आहे. भारताच्या विविध भागांतून अगदी अस्सल आणि चविष्ट पदार्थांचा स्वाद थेट युरोपमध्ये देणे हे माझे ध्येय आहे.”
माजी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रैना पुढे म्हणाला, “आम्ही एकत्र मिळून आज एका नवीन कार्याचा शुभारंभ करत आहोत. स्वादिष्ट, रुचकर पदार्थ लवकरच तुमच्या भेटीला येतील यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्या साहसाला सुरुवात करत असताना या विलक्षण प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा. वेगवेगळे रोमांचक अपडेट्स, तुमच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थांची झलक चाखण्यासाठी तयार राहा. रैना इंडियन रेस्टॉरंटच्या भव्य अनावरणासाठी तयार झाले असून सर्वांच्या सेवेत आता आम्ही हजर झालो आहोत.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community