Suryakumar Yadav : अजित आगरकर यांनी सांगितलं सूर्यकुमारची टी-२० कप्तान म्हणून निवड करण्याचं कारण

हार्दिक पांड्या ऐवजी सूर्यकुमार यादवची टी-२० संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे.

186
Suryakumar Yadav : अजित आगरकर यांनी सांगितलं सूर्यकुमारची टी-२० कप्तान म्हणून निवड करण्याचं कारण
Suryakumar Yadav : अजित आगरकर यांनी सांगितलं सूर्यकुमारची टी-२० कप्तान म्हणून निवड करण्याचं कारण
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर त्याच्या जागी या प्रकारात सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) नेमणूक करण्यात आली. श्रीलंका दौरा हा सूर्यकुमारचा कायमस्वरुपी कर्णधार झाल्यानंतरचा पहिलाच दौरा असेल. हा निर्णय काही जणांसाठी आश्चर्यकारक होता. कारण, अगदी टी-२० विश्वचषकातही हार्दिक पांड्या संघाचा उपकर्णधार होता. आणि स्पर्धेत त्याची कामगिरीही अष्टपैलू आणि चांगली होती. अशावेळी तोच रोहित शर्माकडून (Rohit Sharma) सूत्र हाती घेणार असं वाटत असतानाच सूर्यकुमारची (Suryakumar Yadav) निवड झाली.

ही निवड का झाली याचं उत्तर सोमवारी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी दिलं. ‘तंदुरुस्ती, ड्रेसिंग रुममधील खेळाडूंकडून मिळालेला प्रतिसाद आणि आगामी व्यस्त कार्यक्रमात टी-२० संघात कायमची उपलब्धता हे मुद्दे सूर्यकुमारच्या बाजूने होते, असं आगरकर यांनी एका दमात सांगितलं.

(हेही वाचा – Monsoon Update: २३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट: मुंबईत समुद्राला येणार भरती; जाणून घ्या पावसाचे काय आहेत अपडेट?)

अख्खा हंगाम खेळू शकेल असा खेळाडू नेतृत्व करण्यासाठी हवा होता, असं आगरकर आणि गंभीर अशा दोघांनीही सांगितलं. ‘सूर्यकुमार टी-२० प्रकारातील एक सर्वोत्तम फलंदाज आहे. आणि तो तंदुरुस्तही आहे. मालिकेतील सगळे सामने तो खेळू शकतो. त्याला बदली खेळाडू असू शकत नाही,’ असं अजित आगरकर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) बद्दल बोलताना म्हणाले.

तर हार्दिकच्या कौशल्याचंही त्यांनी कौतुक केलं. पण, दुखापतीविषयी चिंता व्यक्त केली. ‘तंदुरुस्ती हा निवड करतानाचा मुख्य निकष होता. हार्दिक सलग काही मालिका खेळेल याची खात्री आम्हाला वाटली पाहिजे. आणि त्याच्यावर आमचं लक्ष असेलच. सध्या आम्हाला सूर्यकुमारला संधी द्यायची आहे. पुढे बघता येईल,’ असं आगरकर म्हणाले.

श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका २७ जुलैपासून सुरू होणार आहे. आणि २७,२८ आणि ३० अशा तीन दिवशी तीन टी-२० सामने पल्लिकल इथं होणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.