तब्बल १३ वर्षांनी विश्वकप (T-20 World Cup) जिंकलेली टीम इंडिया अखेर मायदेशी परतली आहे. टीममधील खेळाडूंच्या स्वागतासाठी सर्वच उत्सुक आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर टीम इंडिया मुंबईत आली. मुंबईत विजयी रथानंतर राज्याच्या विधीमंडळात टी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार करण्यात आला आहे. या सत्काराच्या वेळी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलेबाजी भाषण केले. (Suryakumar Yadav)
(हेही वाचा – State Cabinet: EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क १00% माफ, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)
दादा गंमतीत म्हणाले, सूर्यकुमार यादवला आम्ही पाहिलेच असते…
अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी यावेळी सूर्यकुमार यादवने फायनलमध्ये घेतलेल्या अप्रतिम झेलचेही कौतुक केले. दादा म्हणाले, सूर्यकुमार यादवने तो झेल टिपला नसता तर आजचा दिवस तुम्हा-आम्हाला दिसला नसता. त्यामुळे त्याचे खूप खूप कौतुक. तसेच ”रोहित म्हणाला तसा, तू कॅच घेतली नसतीस तर तुला बघितलेच असते. पण रोहितने एकट्याने त्याला बघितले नसते, आम्ही सर्वांनीच तुला बघितले असते” कारण, आमचे लोकं फार वेडे आहेत. ते जिंकल्यानंतर टोकाचा उदोउदो करतात आणि हरल्यानंतर दगड फेकून मारण्यासही कमी करत नाहीत. कारण, आपल्याकडे खिलाडूवृत्ती पाहण्यास मिळत नाही, असे अजित पवार यावेळी सूर्यकुमार यादवचे कौतुक करताना म्हणाले. (Suryakumar Yadav)
(हेही वाचा – BMC Hawkers Action : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशालाच काँग्रेसचा विरोध)
मनात चमत्कार घडण्याची आशा होती
अजित पवार म्हणाले की, मागच्या काही काळात अनेक खेळाडूंनी यश मिळवले. पण असा दिमाखदार कार्यक्रम विधिमंडळात केव्हाच आयोजित करण्यात आला नव्हता. असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांचे कौतुक करतो. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या ३० चेंडू श्वास रोखून धरायला लावणारे होते. सामन्याचे शेवटचे ३० चेंडू शिल्लक होते तेव्हा जवळपास सर्वच भारतीयांनी आशा सोडून दिली होती. पण कुठेतरी मनात काहीतरी चमत्कार घडेल असे वाटत होते. शेवटी तो चमत्कार घडला, असे अजित पवार म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदार उपस्थित होते. (Suryakumar Yadav)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community