- ऋजुता लुकतुके
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान टी-२० मालिका सुरू आहे आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा टी-२० तील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. आफ्रिकन मधल्या फळीतील फलंदाज आणि स्वत:ची तडाखेबाज फलंदाज अशी ओळख असलेल्या हेनरिक क्लासेनने सुर्यकुमारला नवीन उपाधी देऊ केली आहे. टी-२० मधील सार्वकालीन सर्वोत्तम खेळाडू कुठला या प्रश्नाचं उत्तर देताना क्लासेनने क्षणाचाही विलंब न लावता, ‘सूर्यकुमार यादव,’ असं उत्तर दिलं आहे. (Suryakumar Yadav)
Heinrich Klaasen showing us he’s got a bit of SKY fever too! 😉
Don’t miss the fireworks from the hard-hitters in the 3rd #SAvIND T20I on November 13, LIVE on #JioCinema, #Sports18 & #ColorsCineplex 👈#JioCinemaSports #TeamIndia #SuryakumarYadav pic.twitter.com/MLHqCtiI7n
— JioCinema (@JioCinema) November 12, 2024
(हेही वाचा – Crime News: निवडणूक पथकाचे अधिकारी असल्याचे भासवत 5 भामट्यांनी व्यापाऱ्याला घातला 25 लाखांचा गंडा)
‘टी-२० साठी बनलेले खास फटके आणि सातत्यपूर्ण कामगिरी,’ हे निकष क्लासेनने त्यासाठी लावले आहेत. त्यानंतर चर्चा क्लासेनला कुठला फटका कुटल्या खेळाडूंकडून शिकायला आवडेल, या विषयावर वळली आणि क्लासेनचं उत्तर होतं, ‘कदाचित एबी डिव्हिलिअर्स आणि सूर्याकडून मला स्कूपचा फटका शिकायला आवडेल. सूर्याचा फाईन लेगला लगावलेला षटकार मला खूप आवडतो. पण, मी तो खेळताना अजूनही चाचपडतो. सूर्यालाच तो फटका चांगला खेळता येतो,’ असं उत्तर क्लासेनने दिलं. (Suryakumar Yadav)
यंदा क्लासेनला त्याच्या सनरायझर्स हैद्राबाद फ्रँचाईजीने सर्वाधिक २३.५ कोटी रुपये पैसे देऊन कायम ठेवलं आहे. आयपीएलमधील तो एक घणाघाती फलंदाज म्हणून ओळखला जातो. (Suryakumar Yadav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community