-
ऋजुता लुकतुके
गोवा रणजी संघाने यंदा रणजी स्पर्धेचा एलीट गट गाठला आहे. नवीन हंगामाच्या सुरुवातीला गोवा क्रिकेट असोसिएशन संघ बांधणीची जोरदार तयारी करत आहे. त्यासाठी त्यांची रणनीती आहे ती इतर राज्यांतील खेळाडू करारबद्ध करण्याची. काही खेळाडूंशी त्यांची बोलणीही सुरू आहेत. मुंबईकर सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचं समजतंय. आणि त्याचवेळी मुंबईचा आणखी एक फलंदाज सूर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) गोव्याशी चर्चा करत असल्याची बातमी बुधवारी पसरली होती.
पण, आता सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) एका ट्विटद्वारे ही बातमी खरी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘हा पत्रकार आहे की, लेखक? मला हसायचं असेल तेव्हा मी विनोदी चित्रपट पाहण्याऐवजी असे लेख वाचून स्वत:चं मनोरंजन करून घेईन,’ असं सूर्यकुमारने ट्विटमध्ये परखडपणे लिहिलं आहे.
(हेही वाचा – Donald Trump Tariff War : अमेरिकेकडून भारतावर २६ टक्के आयात शुल्क, भारत काय उत्तर देणार?)
सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) या बातमीचं खंडण केलं असलं तरी इतर काही फलंदाजांशी गोव्याची बोलणी सुरू आहेत हे नक्की. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणारा आघाडीचा फलंदाज तिलक वर्माही (Tilak Verma) गोव्याच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. ‘आम्ही देशभरात अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंशी बोलत आहोत. अजून नावं निश्चित झालेली नाहीत. आणि जी झाली ती आता आम्ही उघड करू शकत नाही. पण, करारांवर चर्चा सुरू आहेत. काही दिवसांत सगळं निश्चित होईल,’ असं गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शांभा देसाई (Shamba Desai) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
Script writer hai ya journalist? Agar hasna hai toh I will stop watching comedy movies and start reading these articles. Ekdum bakwas 🤣🤣🤣 pic.twitter.com/VG3YwQ5eYb
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) April 2, 2025
(हेही वाचा – BMC : खासगी सहभाग तत्वावरील रुग्णालयांमध्ये महापालिकेचे रुग्ण कोण? कुणाला मिळणार मोफत उपचार?)
दरम्यान, जयस्वालने एमसीएकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याच्या बातमीला देसाई यांनी दुजोरा दिला. ‘८ – १० दिवसांपूर्वी आम्ही यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) संपर्क केला होता. त्याने दोन दिवस आमच्या प्रस्तावावर विचार केला. आणि आता आम्ही कराराच्या पुढील टप्प्यावर पोहोचलो आहोत. काही कागदपत्रांची पूर्तता अजून बाकी आहे. ती झाल्यावर अधिकृतपणे आम्ही जयस्वालच्या समावेशाची घोषणा करू,’ असं देसाई (Shamba Desai) यांनी सांगितलं.
जयस्वाल आणि पाठोपाठ सुर्यकुमारच्या मुंबई सोडण्याच्या चर्चेमुळे मुंबई क्रिकेटला हा मोठा धक्का बसला आहे. आणि मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये सगळं काही आलबेल नसल्याची चर्चाही सुरू झाली आहे. गेल्या हंगामात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि यशस्वी यांच्यात बोलाचाली झाल्याचंही बोललं जात आहे. २०२२ च्या हंगामात दुलिप करंडकादरम्यान पश्चिम विभागाकडून एकत्र खेळताना कर्णधार अजिंक्य रहाणेनं यशस्वी जयस्वालला शिस्तभंगाच्या कारवाईसाठी मैदानाबाहेर घालवलं होतं. तर गेल्या हंगामात यशस्वी मुंबई संघाबरोबर नागपूरला गेला खरा पण, तिथे गुडघेदुखीचं कारण देत सामन्यात खेळला नव्हता. या काही कारणांबरोबरच कप्तानीचा गोव्याने दिलेला प्रस्ताव हे ही कारण असल्याचं बोललं जातंय.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community