- ऋजुता लुकतुके
भारतीय टी-२० मोहिमेला आणि स्वत: सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) वर्षाच्या सुरुवातीलाच एक जोरदार धक्का बसला आहे. टी-२० प्रकारातील भारताचा स्टार खेळाडू असलेला सूर्यकुमार (Suryakumar Yadav) पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे आधी अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाहीए. पण, टाईम्स वृत्तसमुहाने दिलेल्या बातमीनुसार, त्याची दुखापत आणखी मोठी आहे. आणि तो फक्त ही मालिकाच नाही तर अख्खा देशांतर्गत हंगाम आणि पुढे आयपीएलचा अर्धा हंगामही खेळू शकणार नाहीए. या महिन्याच्या शेवटी तो शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला जाणार असल्याचं टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटलं आहे. (Suryakumar Yadav Injury)
‘सूर्यकुमार (Suryakumar Yadav) सध्या बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत उपचार घेत आहे. तिथे २-३ दिवसांची फिजिओथेरपी घेतल्यावर तो म्युनिचला रवाना होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत हंगाम आणि सुरुवातीची आयपीएल तो खेळू शकणार नाही,’ असं बीसीसीआयमधील (BCCI) सूत्रांनी सांगितल्याचं या बातमीत म्हटलं आहे. (Suryakumar Yadav Injury)
२०२२ च्या मध्यावर के एल राहुललाही (KL Rahul) स्पोर्ट्स हार्निया झाला होता. आणि त्यावर बीसीसीआयच्या मध्यस्थीने जर्मनीतच उपचार झाले होते. तेच उपचार आता सूर्यकुमारवर (Suryakumar Yadav) करण्यात येणार आहेत, असं समजतं. (Suryakumar Yadav Injury)
(हेही वाचा – Lok Sabha Elections : भाजपच्या दोन ‘पॉवरफुल्ल’ आमदारांना लोकसभेचे तिकीट नको)
स्पोर्ट्स हार्निया म्हणजे काय?
वेबएमडी वेबसाईटनुसार, स्पोर्ट्स हार्निया म्हणजे तुमचं ओटीपोट किंवा ग्रॉईन भागातील स्नायू, लिगामेंट किंवा टेंडन यांत छोटीशी चिर येणं किंवा हा भाग आखडला जाणं. त्यामुळे भरपूर वेदना होतात. खेळ खेळूनच ही दुखापत होते असं नाही. पण, खेळाडूला अशा प्रकारचा हार्निया होण्याची शक्यता असते. म्हणून याला स्पोर्ट्स हार्निया म्हटलं जातं. (Suryakumar Yadav Injury)
फुटबॉल, रग्बी, कुस्ती आणि आईसहॉकी सारख्या ताकदीच्या खेळात स्पोर्ट्स हार्निया होण्याची शक्यता जास्त असते. दक्षिण आफ्रिकेत टी-२० मालिका खेळताना सुर्याचा घोटा दुखावला होता. त्यात आता स्पोर्ट्स हार्नियाची भर पडली आहे. (Suryakumar Yadav Injury)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community