- ऋजुता लुकतुके
टी-२० क्रिकेटमध्ये स्काय किंवा मि. ३६० म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव आता नवीन भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी ७ सामन्यांसाठी त्याने ही भूमिका निभावलीय. पण, आता तो नियमितपणे ही जबाबदारी पेलणार आहे आणि आगामी श्रीलंका दौऱ्यात त्याचा कस पहिल्यांदा लागणार आहे. (Suryakumar Yadav)
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव टी-२० संघाचा कर्णधार झाला आहे. पण, विशेष म्हणजे ही जबाबदारी त्याला फारशी कठीण वाटत नाही. यापूर्वी एकदिवसीय विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत त्याने कर्णधारपद पहिल्यांदा भूषवलं होतं आणि ही मालिकाही भारतीय संघाने ४-१ अशी जिंकली. तर दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाने मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. आता कायमस्वरुपी टी-२० कर्णधार झाल्यावर स्टार स्पोर्ट्स वाहिनीने त्याचा २०२३ मधील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर केला आहे. यात सूर्यकुमार कप्तानीबद्दल बोलताना दिसतो. (Suryakumar Yadav)
आपला यशाचा मंत्र सांगताना तो म्हणतो, ‘मला नवीन भूमिका आवडतेय. मी सगळ्यांबरोबर पूर्वी क्रिकेट खेळलेलो आहे. त्यामुळे मी सगळ्यांना ओळखतो. त्यांचे कच्चे दुवे आणि बलस्थानं मला ठाऊक आहेत. एकत्र खेळल्यामुळे आमचे संबंध चांगले आहेत. अशावेळी नेतृत्व करणं फारसं कठीण जात नाही.’ (Suryakumar Yadav)
.@surya_14kumar is the new T20 captain for #TeamIndia! 🇮🇳
Watch him talk about leading the team and the strong bond he shares with his teammates! 🫡💙#MenInBlue #SLvIND pic.twitter.com/BHILBqp5k3
— Star Sports (@StarSportsIndia) July 18, 2024
(हेही वाचा – Azad Engineering Share Price : आझाद इंजिनिअरिंग शेअरला ५ टक्क्यांचं अपर सर्किट)
‘मला गोष्टी साध्या, सोप्या ठेवायला आवडतात. सगळ्याची एक प्रक्रिया असते आणि व्यवस्था लावून देणं हे मी प्राधान्यक्रमाने करतो. तुम्ही आहात तसे राहा, काहीतरी नवीन करायला जाऊ नका, एवढंच मी सगळ्यांना सांगत असतो,’ असं पुढे सूर्यकुमार यादव या व्हिडिओत सांगतो. श्रीलंका दौऱ्यात २७ जुलैपासून टी-२० मालिका सुरू होणार आहे आणि सूर्यकुमार या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करेल. (Suryakumar Yadav)
भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांनी निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर भारतीय संघ स्थित्यंतरातून जात आहे. अशा वेळी सूर्यकुमारचं नेतृत्व संघ उभारणीत महत्त्वाचं ठरणार आहे. (Suryakumar Yadav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community