Suryakumar Yadav : निवड समिती, गंभीरला पांड्याऐवजी सूर्यकुमार कप्तान म्हणून का हवा?

Suryakumar Yadav : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव होईल अशी जोरदार चर्चा आहे 

154
Suryakumar Yadav : सूर्यकुमारला कप्तानी फारशी कठीण का वाटत नाही?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. त्याच दिवशी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या संघातील ज्येष्ठ खेळाडूंनी टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. तेव्हापासून रोहित शर्माचा टी-२० तील वारसदार कोण होणार, म्हणजेच टी-२० संघाचं नेतृत्व कोण करणार यावर चर्चा सुरू झाली आहे. विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार असलेला हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा नैसर्गिक वारसदार असू शकला असता. असं असताना निवड समिती आणि नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) हे सुर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) बाजूने झुकलेले दिसत आहेत.

असं का असावं? हार्दिक आणि सूर्यकुमार या दोघांनीही टी-२० विश्वचषकात मोलाची कामगिरी बजावलेली असताना पारडं सूर्यकुमारच्या बाजूने का झुकलं असावं याचा विचार करुया. (Suryakumar Yadav)

(हेही वाचा- Benelli 402S : बेनेलीची नवीन ‘सिटी क्रूझर’ भारतात दाखल)

सूर्यकुमार यादवचा मैदानातील वावर हा उत्साहवर्धक आहे. मोक्याच्या क्षणी कामगिरी करताना तो कधीही चुकत नाही. स्लिपमध्ये घेतलेले अवधड झेल असोत किंवा अंतिम सामन्यात सीमारेषेवर त्याने घेतलेला डेव्हिड मिलरचा (David Miller) झेल असो, त्याची जिगर त्यातून दिसून येते. टी-२० प्रकारात तो सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. त्याच्या नावावर ४ शतकांसह २३४० धावा जमा आहेत. तर हार्दिक पांड्याने १०० सामन्यांत १,४९२ धावांसह ८४ बळीही मिळवले आहेत. (Suryakumar Yadav)

हार्दिकच्या कप्तानीखाली भारतीय संघाने १६ पैकी १० टी-२० सामने जिंकलेही आहेत. अशावेळी सूर्यकुमार यादवकडे कप्तानी सोपवण्याचा विचार पहिल्यांदा गंभीरने केला असं समजतंय. गंभीर कोलकाता संघाचा कर्णधार असताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या हाताखाली खेळला आहे. आता जो कर्णधार नेमायचा आहे तो २०२६ पर्यंत त्या पदावर असेल असं नियोजन गंभीर यांना करायचं आहे. अशावेळी त्याची पसंती सूर्यकुमारला होती. अजित आगरकर आणि गंभीर यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर हार्दिकशीही (Hardik Pandya) कप्तानीवर चर्चा केल्याचं समोर येत आहे. आगरकर आणि गंभीर यांचं मत तयार झाल्यावर त्यांनी हार्दिक पांड्या आणि संघालाही या गोष्टीची कल्पना दिली आहे. (Suryakumar Yadav)

(हेही वाचा- Pune Porsche Car Accident : ‘त्या’ 300 शब्दांच्या निबंधाविषयी संतापच; जामीन प्रक्रियेत त्रुटी आढळल्याचा अहवाल)

श्रीलंका दौऱ्यात टी-२० संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमारची निवड होऊ शकते. वैयक्तिक कारणांमुळे हार्दिक लंका दौऱ्यावर जाणार नाहीए. (Suryakumar Yadav)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.