ऋजुता लुकतुके
आकाशात कुठल्याही दिशेनं षटकार ठोकण्याची क्षमता असलेल्या सुर्यकुमार यादवला कौतुकाने स्काय असं म्हटलं जातं. ही त्याच्या नावाची अद्याक्षरंही आहेत. पण, त्याहून महत्त्वाचं म्हणजे ही अक्षरं त्याच्या फलंदाजीची ओळख आहेत. सध्या त्याचा फॉर्मही जोरात आहे. त्यामुळे आयसीसी टी-२० क्रमवारीत फलंदाजीत सुर्यकुमारने आपलं वर्चस्व कायम राखलं आहे.
अलीकडेच गेबेखा टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुर्यकुमारने (Suryakumar Yadav) ३६ चेंडूंत ५६ धावा केल्या. त्यामुळे त्याने फलंदाजीचे १० रेटिंग गुण कमावले आहेत. त्याचे एकूण गुण ८६५ झाले आहेत. सुर्याचा निकटचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा महम्मद रिझवानचे ७८७ रेटिंग गुण आहेत. म्हणजेच सुर्याकडे तब्बल ७८ गुणांची आघाडी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम ७५८ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
🔹 SKY extends lead
🔹 Rashid Khan joins Ravi Bishnoi at the top
🔹 Aiden Markram risesLots of movement in the latest update of the @MRFWorldwide ICC Men’s T20I Player Rankings 👉 https://t.co/36otRjMs40 pic.twitter.com/6AE1QWAJRR
— ICC (@ICC) December 13, 2023
रिंकू सिंगने गेबेखा टी-२० केलेल्या तडाखेबंद अर्धशतकानंतर क्रमवारीत ४६ जागांची उसळी घेऊन तो ५९ व्या स्थानावर पोहोचला आहे. तर ऋतुराज गायकवाड हा आणखी एक भारतीय फलंदाज पहिल्या (Suryakumar Yadav) दहात आहे. फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायची संधी मिळाली नाही. त्यामुळे गोलंदाजीत त्याचा अव्वल क्रमांक आता अफगाणिस्तानचा रशिद खानकडे गेला आहे. इतर कुठलाही भारतीय गोलंदाज पहिल्या दहांत नाही. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर आहे.
गेल्यावर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात सुर्यकुमारच्या फलंदाजीचा जलवा क्रिकेट जगताला पहिल्यांदा दिसला. आणि तेव्हाच तो पहिल्यांदा क्रमवारीत अव्वल स्थानावर आला. आणि आता त्याचं वर्चस्व पाहता, तो आगामी टी-२० विश्वचषकापर्यंत या स्थानावर राहीलं असं दिसतंय.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community