- ऋजुता लुकतुके
मैदानाच्या आठही दिशांना फटके खेळू शकण्याची क्षमता असलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या याच कौशल्यामुळे स्काय म्हणून ओळखला जातो. एकदिवसीय विश्वचषकानंतर खेळवल्या गेलेल्या टी-२० सामन्यांमधूनही त्याने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून क्रिकेटपासून दूर असला आणि आता देशांतर्गत लीग खेळत असला तरी सूर्यकुमारने आयसीसी क्रमवारीतील आपला दबदबा कायम राखला आहे. तब्बल सहा महिने तो फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान राखून आहे. ८६१ गुण त्याच्या खात्यात जमा आहेत आणि ते फेब्रुवारीपासून होते. इंग्लंडचा फिल सॉल्ट आता त्याच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Suryakumar Yadav)
गोलंदाजांमघ्ये बांगलादेशचे तस्किन अहमद आणि मेहदी हसन या अनुक्रमे तेज आणि फिरकी गोलंदाजांनी झिंबाब्वे विरुद्धच्या मालिकेनंतर क्रमवारीत चांगलीच मुसंडी मारली आहे. तस्किनने या मालिकेत ८.८२ च्या सरासरीने ६ बळी मिळवले आणि त्याच्या जोरावर तो गोलंदाजांच्या क्रमवारीत २६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर मेहदीने दोन सामन्यांत ३ बळी मिळवत २२ वं स्थान पटकावलं आहे. (Suryakumar Yadav)
(हेही वाचा – Mahanand चा ताबा मदर डेअरीकडे)
तर झिंबाब्वेचा तेज गोलंदाज मुझराबानी देखील बांगलादेश विरुद्ध ४ बळी मिळवत क्रमवारीत चार स्थानांनी पुढे गेला आहे. आता तो ६९व्या स्थानावर असेल. बांगलादेशचा २३ वर्षीय फलंदाज तौहिद ह्रिदय आता पहिल्या शंभरात पोहोचला आहे. झिंबाब्वेविरुद्ध १२७ धावा करताना तो दोनवेळा नाबादही राहिला होता. त्याचा फायदा होऊन तो आता नव्वदाव्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशी फलंदाज महमदुल्लाही दोन स्थानांनी वर चढून ८१ वर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मात्र दुसऱ्या क्रमांकावरील सॉल्टपेक्षा ५९ गुणांनी आघाडीवर आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकानंतरही तोच फलंदाजीच्या क्रमवारीत आघाडीवर राहील अशी लक्षणं आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार सध्याचा सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. आणि ५ आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. (Suryakumar Yadav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community