Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव मुंबईकडून रणजी खेळणार 

Suryakumar Yadav : श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका संपल्यावर सूर्यकुमार मोकळा आहे 

100
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव मुंबईकडून रणजी खेळणार 
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव मुंबईकडून रणजी खेळणार 
  • ऋजुता लुकतुके

नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवला. रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर भारतीय टी-२० संघाचं नेतृत्व आता सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) सोपवण्यात आलं आहे. पण, त्याचवेळी सुर्याचा फक्त टी-२० संघासाठीच विचार झाला होता. एकदिवसीय राष्ट्रीय संघात सध्या त्याचा विचार होत नसल्याचं निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी त्यावेळीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आगामी काळात आंतरराष्ट्रीय जबाबदारीतून मोकळा असलेल्या सूर्यकुमारने मुंबईकडून बूचीबाबू करंडक खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तसं त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून कळवलंही आहे. .

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे प्रमुख संजय पाटील (Sanjay Patil) यांना बुची बाबू स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचं कळवलं आहे. या स्पर्धेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादव या स्पर्धेत २५ ऑगस्टपासून सहभागी होईल. मुंबईकडून खेळण्यासाठी मी नेहमी उपलब्ध आहे, असं देखील सूर्यानं म्हटलं.

(हेही वाचा- Navi Mumbai Airport ला दि. बा. पाटील यांचे नाव द्या; रविंद्र वायकरांनी लोकसभेत केली मागणी)

मुंबई क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज खान (Sarfaraz Khan) आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) भारताच्या टी २० संघाचं नेतृत्त्व करत असला तरी त्यानं या स्पर्धेत सरफराज खानच्या नेतृत्त्वात खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यात बुची बाबू स्पर्धेतील सामना २७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. सूर्यकुमार यादवनं त्याच्या नावाचा समावेश मुंबईच्या संघात करण्याबाबत कळवल्यानं तो या मॅचमध्ये मुंबईकडून खेळताना पाहायला मिळेल.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरफराज खानला मुंबईच्या संघाचं नेतृत्त्व करु द्या, अशी सूचना सूर्यकुमार यादवनेच (Suryakumar Yadav) केली होती.

(हेही वाचा- कितीही मोठ्या अभिनेत्री असाल, नियमांचे पालन करावे लागेल; Jaya Bachchan यांना उपराष्ट्रपतींनी सुनावले)

अगदी राहुल द्रविड प्रशिक्षक असतानाही त्यांनी सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) टी-२० मधील तज्ज खेळाडू म्हणून पाहिलं होतं. एकदिवसीय क्रिकेटसाठी त्याचा विचार झाला नव्हता. त्यामुळे सूर्यकुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकदिवसीय व कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याच्या विचारात आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.