- ऋजुता लुकतुके
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अलीकडेच अमेरिका दौऱ्यावर तिथला लोकप्रिय बेसबॉल क्लब यांकीला भेट दिली. न्यूयॉर्क यांकी क्लबने यावेळी त्याचा सत्कार केला आणि त्याला संघाची जर्सीही प्रदान केली. न्यूयॉर्कमधील यांकीज् हे स्टेडिअमही ऐतिहासिक आणि प्रसिद्ध आहे. इथं सूर्या असं लिहिलेली आणि ६३ क्रमांकाची जर्सी सूर्यकुमारला भेट देण्यात आली.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर सूर्यकुमार (Suryakumar Yadav) आपल्या कुटुंबीयांसह अमेरिका दौऱ्यावर आहे. यांकीज् चा चाहता असलेल्या सूर्यकुमारला इथं खास आमंत्रण देण्यात आलं होतं. अमेरिकेत आता क्रिकेटचा प्रसार होतो आहे. २०२८ च्या लॉस एंजलीस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेटशी अनेक बाबतीत साम्य असलेल्या या खेळातील सगळ्यात जुन्या क्लबने सूर्यकुमारला मुद्दाम आपल्या क्लबमध्ये बोलावलं होतं.
Welcome to Yankee Stadium, @surya_14kumar 👋#YANKSonYES pic.twitter.com/DSNfC1vzZQ
— YES Network (@YESNetwork) August 10, 2024
(हेही वाचा – Supreme Court : शंभू सीमा अर्धवट उघडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश)
या दृष्टीने सूर्यकुमारची अमेरिका भेट महत्त्वाची
टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्माने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानंतर अलीकडेच भारतीय टी-२० संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमारची (Suryakumar Yadav) ही अमेरिका वारी महत्त्वाची मानली जात आहे. कारण, लॉस एंजलीस ऑलिम्पिकमध्येही टी-२० प्रकारातच स्पर्धा होणार आहे. रोहित आणि विराट दोघांनीही या प्रकारात निवृत्ती स्वीकारली आहे. विराट कोहली २०२८ च्या ऑलिम्पिकचा ब्रँड अँबेसिडर आहे. पण, अमेरिकेत टी-२० चा प्रचार करण्याच्या दृष्टीने सूर्यकुमारची अमेरिका भेट महत्त्वाची आहे.
अलीकडेच भारतीय टी-२० संघाचा कर्णधार झाल्यानंतर पहिल्याच मालिकेत सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध ३-० असा विजय मिळवून दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community