ऋजुता लुकतुके
आधी ऑस्ट्रेलियातील टी-२० मालिका आणि आता परदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आघाडीवर लढून संघाचं नेतृत्व करत आहे. गेबेखामध्ये ढगाळ वातावरणात आज सुर्यकुमारने खराब सुरुवात झाल्यानंतरही भारतीय डाव सावरला. आणि अर्धशतक ठोकून संघाला १८० धावांचा टप्पाही गाठून दिला. दुर्दैवाने भारताने हा सामना गमावला. पण, आपल्या ५६ धावांच्या खेळीदरम्यान सुर्यकुमारने २,००० टी-२० धावांचा महत्त्वाचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे हा टप्पा पार करताना त्याने विराटच्या एका विक्रमाशी बरोबरीही केली आहे.
Milestone 🔓
2⃣0⃣0⃣0⃣ T20I runs (and going strong 💪💪) for Suryakumar Yadav! 👏 👏
Follow the Match 👉 https://t.co/4DtSrebAgI #TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/lK1n7BvpzQ
— BCCI (@BCCI) December 12, 2023
सुर्यकुमारने (Suryakumar Yadav) ५६ डावांमध्येच दोनहजार धावांचा टप्पा पार केला. भारतातर्फे सगळ्यात जलद दोन हजार धावा करण्याचा विक्रम सुर्यकुमारने आपल्या नावावर केलाय. या बाबतीत त्याने विराटशी बरोबरी केली आहे. पण, सुर्यकुमारने १,१६४ चेंडूंत २,००० धावा पूर्ण केल्या. या बाबतीत तो विराटपेक्षा पुढे आहे.
काही वेळानंतर सुर्यकुमारने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. दक्षिण आफ्रिकेत टी-२० सामन्यांत अर्धशतक करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. अखेर सुर्यकुमार ५६ धावांवर बाद झाला. त्याने ३ षटकार आणि ५ चौकार ठोकले.
5⃣0⃣ up for @surya_14kumar! 👏 👏
Talk about leading from the front! 👍 👍#TeamIndia inching closer to 100.
Follow the Match 👉 https://t.co/4DtSrebAgI #SAvIND pic.twitter.com/qYfS0cWOu1
— BCCI (@BCCI) December 12, 2023
आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० क्रिकेटमध्ये २,००० धावांचा टप्पा सर्वात जलद पार करण्याचा विक्रम संयुक्तरित्या पाकिस्तानचे बाबर आझम आणि महम्मद रिझवान यांच्या नावावर आहे. दोघांनीही ५२ डावांमध्ये हा टप्पा पार केला आहे. या दोघांनंतर सुर्यकुमार आणि विराटचाच नंबर लागतो. तर भारताच्या के एल राहुलने ५८ डावांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community