Suryakumar Yadav : टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने शेफ बनून केलं व्यक्ष आणि रमणदीप सिंग यांचं संघात स्वागत

Suryakumar Yadav : पहिल्या टी-२० सामन्यात भारताने द आफ्रिकेचा आरामात पराभव केला आहे. 

157
Ranji Knockout : सूर्यकुमार यादव मुंबईकडून रणजी बाद फेरीत खेळणार
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिला टी-२० सामना मोठ्या फरकाने जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पण, या सामन्यापूर्वी बीसीसीआयने प्रसिद्ध केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दोन नवीन खेळाडू विजयकुमार व्यक्ष आणि रमणदीप सिंग यांचं स्वागत करताना दिसतो. पण, हे स्वागत तो मजेशीर पद्धतीने करतो. या ट्विटला मथळाच मजेशीर आहे.

‘कॅप्टन व शेफ स्काय दोन नवीन चेहरे/पदार्थ भारतीय संघाच्या मेन्यूत सादर करत आहे. दोन्ही पदार्थ मेजवानीसाठी तयार आहेत,’ असं या संदेशात म्हटलं आहे. सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) संघात स्काय या टोपणनावाने ओळखलं जातं.

(हेही वाचा – Accident News: Mumbai-Pune Expressway वर भीषण अपघात! खासगी बसची ट्रकला धडक, ३८ प्रवासी…)

रमणदीप आणि व्यक्ष यांची भारतीय टी-२० संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उर्वरित तीन सामन्यांत त्यांना संधी मिळेल अशी आशा आहे. मालिकेत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. आता उर्वरित सामने १० (गेबेखा), १३ (सेंच्युरियन) आणि १५ (जोहानसबर्ग) इथं होणार आहेत.

भारतीय टी-२० संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार व्यक्ष, आवेश खान व यश दयाल

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.