-
ऋजुता लुकतुके
या ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकणारा महाराष्ट्राचा स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale Comes Home) गुरुवारी त्याच्या गावी परतला तेव्हा त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. आपले प्रशिक्षक आणि निकटवर्तीयांचे स्वप्निलने यावेळी आभार मानले. स्वप्निल कोल्हापूर जवळच्या कागलगावचा आहे. या ऑलिम्पिकमध्ये मनू भाकेर, सरबज्योत सिंग यांच्या मागोमाग नेमबाजीत पदक जिंकणारा तो तिसरा भारतीय नेमबाज ठरला आहे. (Swapnil Kusale Comes Home)
(हेही वाचा- Hockey Team Bags Bronze : ‘सरपंच साहेब,’ म्हणत हरमनप्रीतला जेव्हा पंतप्रधान मोदींनी घातली साद )
स्वप्निल पुण्यात बालेवाडी इथं दीपाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. पॅरिसहून गुरुवारी तो थेट पुण्यात पोहोचला. तिथे विमानतळापासून दगडूशेठ हलवाई गणपतीपर्यत त्याची मिरवणूक काढण्यात आली. आपल्या कुटुंबीयांसोबत स्वप्निलने दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. (Swapnil Kusale Comes Home)
#WATCH | Maharashtra: Olympic medalist Swapnil Kusale receives a grand welcome as he arrives at Pune airport
He won Bronze medal in Men’s 50m Rifle in the #ParisOlympics2024. pic.twitter.com/q4D25t4JtY
— ANI (@ANI) August 8, 2024
‘हे पदक एकट्या माझं नाही. भारत देश आणि महाराष्ट्रीयन जनता यांना मी ते समर्पित करतो. माझ्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा दिला ते माझे निकटवर्तीय, प्रशिक्षक, नेमबाजी संघटना, क्रीडा मंत्रालय अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे. पुणे हे माझं दुसरं घर आहे. त्यामुळे भारतात परतल्यावर मला गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं. इथे आरती करायची होती,’ असं स्वप्निल म्हणाला. (Swapnil Kusale Comes Home)
(हेही वाचा- Manish Sisodia: दिल्ली मद्यधोरण प्रकरणात मनिष सिसोदिया यांना जामीन मंजूर, अटी-शर्थी लागू)
५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात ऑलिम्पिक पदक मिळवणारा स्वप्निल हा पहिला भारतीय आहे. पदकापर्यंतचा प्रवास सांगताना स्वप्निल थोडा भावूकही झाला होता. ‘कोव्हिड नंतर पुन्हा नेमबाजी सुरू केली तेव्हा सगळं कठीण होतं. ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्याचा ध्यास ठेवला होता. पण, रस्ता खडतर होता. घरची परिस्थिती नव्हती. सुरुवातीला प्रायोजकही नव्हते. फक्त तंत्रावर लक्ष केंद्रीत केलं. कामगिरीला महत्त्व दिलं. आणि अखेर प्रायोजन मिळाले. बरेच खर्च सोपे झाले,’ असं स्वप्निल म्हणाला. (Swapnil Kusale Comes Home)
तर कुटुंबीयांनी गरिबीतही या खेळासाठी दिलेल्या पाठिंब्याचा त्याने आवर्जून उल्लेख केला. (Swapnil Kusale Comes Home)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community