Sydney Test : आकाशदीपला दुखापत, अंतिम अकराची निवड खेळपट्टी पाहिल्यावर – गौतम गंभीर 

Sydney Test : सिडनी कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेला रोहित नाही तर गंभीर सामोरं गेला

41
Sydney Test : आकाशदीपला दुखापत, अंतिम अकराची निवड खेळपट्टी पाहिल्यावर - गौतम गंभीर 
Sydney Test : आकाशदीपला दुखापत, अंतिम अकराची निवड खेळपट्टी पाहिल्यावर - गौतम गंभीर 
  • ऋजुता लुकतुके

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या सिडनी कसोटीला आता भारतीय संघाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. बोर्डर – गावसकर चषक राखण्याची ही एकमेव संधी भारताकडे आहे. आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची आशा टिकण्याचाही हा शेवटचा प्रयत्न असेल. अशावेळी कसोटीच्या आधी होणाऱ्या पत्रकार परिषदेला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सामोरं गेला. ‘आकाशदीप पाठीच्या दुखण्यामुळे निवडीसाठी उपलब्ध नाही. बाकी सगळे खेळाडू तंदुरुस्त आहेत,’ गंभीरने आल्या आल्याच पत्रकारांना सांगितलं. तर अंतिम अकरांची निवड सकाळी खेळपट्टी पाहून करू असंही त्याने जाहीर केलं. (Sydney Test)

(हेही वाचा- Boxing Day Test : भारताने मेलबर्न कसोटी का गमावली? शास्त्रींनी दिलं हे कारण)

गंभीरसाठी पत्रकारांकडे गुरुवारी भरपूर प्रश्न होते. त्यातल्या काहींची गंभीरने स्पष्ट उत्तरं दिली. ‘संघाच्या बैठकांमध्ये सध्या एकमेव गोष्टीवर चर्चा सुरू आहे. आणि ती म्हणजे पुढील कसोटी कशी जिंकायचा. या कसोटीचं संघासाठी असलेलं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे,’ असं गंभीर स्पष्टपणे म्हणाला. त्याला पुढील प्रश्न विचारला गेला तो रोहित प्रत्रकार परिषदेला का आला नाही? (Sydney Test)

त्याला उत्तर देताना मात्र गंभीर थोडा सांभाळून बोलत होता. ‘रोहित बरा आहे. त्याला काही झालेलं नाही. कर्णधारानेच पत्रकार परिषद घ्यावी असा काही नियम नाही. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक तुमच्यासमोर आहे. आणि हे ठिकच आहे. यात काही वावगं मला वाटत नाही. आम्हाला अंतिम अकरा जणांची निवड करताना शुक्रवारी सकाळी खेळपट्टीला नीट पारखून बघायचं आहे,’ इतकंच गंभीर म्हणाला. (Sydney Test)

(हेही वाचा- Attack in US Night Club : अमेरिकेत २४ तासांत तिसरा हल्ला; आता नाईट क्लबवर गोळीबार)

गुरुवारी, गंभीर, संघाचा उपकप्तान जसप्रीत बुमराह आणि निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात सिडनी मैदानावरच गहन चर्चा झाली. काही तास तिघं बोलताना दिसले. मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर गौतम गंभीर खेळाडूंवर चिडल्याची बातमी अलीकडेच इंडियन एक्सप्रेस समुहाने दिली होती. गंभीरने खेळाडूंना मनमानी चालणार नाही. आणि तो सांगेल ते ऐकावं लागेल असं सुनावल्याचंही या बातमीत म्हटलं होतं. रोहित आणि विराट या स्टार खेळाडूंचा गमावलेला फॉर्म आणि बुमराहला गोलंदाजी इतरांची न मिळालेली साथ या भारताच्या प्रमुख समस्या आहेत. आताही रोहित शर्माला कुठल्या क्रमांकावर खेळवायचं हा संघासमोरचा मोठा प्रश्न असणार आहे. (Sydney Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.