Sydney Test : ऑस्ट्रेलियाला खुणावतोय सिडनीत भारताविरुद्ध हा अनोखा विक्रम

Sydney Test : सिडनी कसोटीत विजय किंवा अगदी बरोबरीही ऑस्ट्रेलियाला मालिका विजयासाठी पुरेसी आहे

98
Sydney Test : ऑस्ट्रेलियाला खुणावतोय सिडनीत भारताविरुद्ध हा अनोखा विक्रम
Sydney Test : ऑस्ट्रेलियाला खुणावतोय सिडनीत भारताविरुद्ध हा अनोखा विक्रम
  • ऋजुता लुकतुके

मेलबर्न कसोटीतील विजयामुळे या मालिकेतील बरोबरीची कोंडी चौथ्या कसोटीत फुटली आहे. आणि ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. आता १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाला बोर्डर – गावसकर चषक जिंकण्याची संधी चालून आली आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियन संघाला १९९७ च्या विजयाची पुनरावृत्ती खुणावत आहे. तेव्हाही पहिली कसोटी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने सिडनीत मालिका जिंकली होती. (Sydney Test)

या मालिकेतही ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. आणि त्यांनी पहिलीच पर्थ कसोटी तब्बल २९४ धावांनी गमावली. पण, दुसऱ्या दिवस रात्र चाललेल्या ॲडलेड कसोटीत त्यांनी पुनरागमन केलं. तीनच दिवसांत ही कसोटी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी त्यांनी साधली. तिसरी ब्रिस्बेन कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली. ५ दिवसांपैकी एकाही दिवशी पावसामुळे संपूर्ण खेळ झाला नाही. आणि चौथ्या मेलबर्न कसोटीत पाचव्या दिवशी चहापानानंतर ७ भारतीय फलंदाज बाद करत ऑस्ट्रेलियाने आणखी एक संस्मरणीय विजय मिळवला आहे. अनिर्णित होऊ शकणारी कसोटी त्यांनी जिंकली. आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. (Sydney Test)

(हेही वाचा- Shiv Sena UBT कडून Rashmi Shukla यांचे Walmik Karad च्या शरणागतीबद्दल अभिनंदन!)

सिडनी कसोटी त्यांनी जिंकली किंवा अनिर्णित जरी राखली तरी बोर्डर गावसकर चषक ऑस्ट्रेलियन संघाचा होणार आहे. यामुळे १९९७ च्या ॲशेस मालिकेच्या आठवणी मात्र ताज्या झाल्या आहेत. एबीसी वाहिनीने तयार केलेल्या एका रिपोर्टनुसार, ‘ऑस्ट्रेलियाने बोर्डर – गावसकर मालिका जिंकली तर १९९७ च्या ॲशेसनंतर ०-१ पिछाडी भरून काढत मालिका जिंकण्याची ऑस्ट्रेलियन संघाची ही पहिलीच वेळ असेल.’ (Sydney Test)

मात्र भारतीय संघाने सिडनीत विजय मिळवला तर बोर्डर – गावसकर चषक भारताकडेच राहील. आणि मालिका २-२ अशी बरोबरीत राहील. इतकंच नाही तर २१ वर्षांत पहिल्यांदाच सिडनीत मालिकेतील अखेरची कसोटी होत आहे. आणि तोपर्यंत मालिकेचा निकाल लागलेला नाही, अशी वेळ २००३ नंतर पहिल्यांदा आली आहे. आतापर्यंत सिडनी कसोटीच्या आधी मालिकेचा निकाल लागलेलाच असायचा. पण, इथं भारतालाही बरोबरीची संधी आहे. (Sydney Test)

(हेही वाचा- नववर्षानिमित्त Raj Thackeray यांचा मनसैनिकांसाठी खास संदेश; म्हणाले, “निवडणुकीत जे घडलं ते…”)

भारतापुरतं बोलायचं तर आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने भारताला सिडनी कसोटी जिंकावीच लागणार आहे. (Sydney Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.