-
ऋजुता लुकतुके
बोर्डर – गावसकर मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ ने आघाडीवर असली तरी भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने मालिकेवर संपूर्ण वर्चस्व गाजवलं आहे. आतापर्यंत ४ कसोटींत त्याने ३० बळी मिळवले आहेत. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी एलबीजही त्याच्या प्रेमात आहेत. सिडनी कसोटीपूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा त्यांनी बुमराहला थोडं चिडवलं. ‘तुला थांबवण्यासाठी आता आम्हाला कायदा करावा लागेल,’ असं ते म्हणाले तेव्हा एकच हशा पिकला. (Sydney Test)
(हेही वाचा- Maharashtra Weather : राज्यातील हवामानात मोठे बदल; पहाटे धुकं, दुपारी उकाडा, रात्री थंडी)
पंतप्रधानांनी किरबिली हाऊस इथं नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी ठेवली होती. आणि त्यासाठी दोन्ही संघांना आमंत्रण होतं. अचूक आणि धारदार गोलंदाजीने या मालिकेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना पेचात टाकलं आहे. त्याने ३० बळी घेतले आहेत ते १२.८३ धावांच्या सरासरीने. आणि षटकामागे त्याने फक्त २.९२ धावा मोजल्या आहेत. (Sydney Test)
The Australian and Indian teams have already given us an incredible summer of cricket. pic.twitter.com/oqVDOOr5Bm
— Anthony Albanese (@AlboMP) January 1, 2025
‘आम्ही इथं एक कायदा संमत करायचं ठरवलं आहे. सिडनीत बुमराहला डा्व्या हाताने गोलंदाजी करावी लागेल. किंवा एखादं फूट मागून गोलंदाजी करावी लागेल. पण, विनोदाचा भाग सोडला, तर बुमराहला गोलंदाजी करताना पाहणं हा निखळ आनंद आहे,’ असं एल्बनीज यांनी बोलून दाखवलं. (Sydney Test)
(हेही वाचा- Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याप्रकरणी वरळीतून एक जण ताब्यात)
ही सिडनी कसोटी आणखी एका कारणासाठी महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅग्राची पत्नी जेन मॅग्राचा स्मृतीदिन म्हणून हा दिवस इथं साजरा होतो. जेनचं आयुष्य कर्करोगाने अवेळी संपवलं. आणि त्यानंतर ग्लेन मॅग्रा कर्करोगाच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करतो. आणि त्यासाठी पत्नीचा स्मृतीदिन तो साजरा करतो, ज्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ या कसोटीत गुलाबी रंगाची टोपी घालून उतरेल. फोटोशूटसाठी खेळाडूंनी गुलाबी टोपीच परिधान केली होती. (Sydney Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community