-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियन संघाने कसोटीच्या एक दिवस आधी अंतिम अकरा खेळाडू घोषित करण्याची परंपरा मालिकेतील शेवटच्या कसोटीतही कायम ठेवली आहे. मुख्य तेज गोलंदाज मिचेल स्टार्कला मेलबर्नमध्ये पाठीच्या दुखण्याने सतावलं होतं. पण, तो तंदुरुस्त असून सिडनीमध्ये खेळणार आहे. तर आतापर्यंत अपयशी ठरलेल्या मिचेल मार्शच्या ऐवजी संघाने बो वेबस्टरला पसंती दिली आहे. संघात हा एकमेव बदल झाला आहे. वेबस्टरसाठी हा पदार्पणाचा सामना असून ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा तो ४६९ वा खेळाडू ठरला आहे. (Sydney Test)
(हेही वाचा- Sydney Test : आकाशदीपला दुखापत, अंतिम अकराची निवड खेळपट्टी पाहिल्यावर – गौतम गंभीर )
मार्शने आतापर्यंत या मालिकेत १० धावांच्या सरासरीने फक्त ७१ धावा केल्या आहेत. आणि सध्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या सहा फलंदाजांकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ती पूर्ण न करू शकल्यामुळे मार्शची संघातून गच्छंती झाली आहे. वेबस्टर ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत क्रिकेटमधील सध्याचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे स्टार्कच्या मदतीला गोलंदाजीची धार वाढवण्यासाठी वेबस्टरचा संघात समावेश झाला आहे. (Sydney Test)
‘मिचेलने या मालिकेत धावा केलेल्या नाहीत, हे तो ही मान्य करेल. त्याला पुरेसे बळीही मिळालेले नाहीत. त्यामुळे संघासाठी तो अजूनही महत्त्वाचा असला तरी वेबस्टरला संधी देण्याचीही हीच वेळ आहे, असं आम्हाला वाटतं. वेबस्टर या मालिकेत आमच्याबरोबर आहे. त्यालाही संधी मिळाली पाहिजे,’ असं कमिन्सने बोलून दाखवलं. (Sydney Test)
(हेही वाचा- Attack in US Night Club : अमेरिकेत २४ तासांत तिसरा हल्ला; आता नाईट क्लबवर गोळीबार)
दुसरीकडे, मिचेल स्टार्क पाठीच्या दुखण्यातून सावरला असून सिडनीत खेळणार आहे. स्टार्कला सामन्यापासून दूर ठेवणं कठीण आहे, असं कमिन्सने गमतीने बोलून दाखवलं. मेलबर्न कसोटीत शेवटच्या सत्रात दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाने विजय खेचून आणला आणि मालिकेत २-१ ने आधाडी घेतली आहे. आता सिडनी कसोटी जिंकून किंवा अनिर्णित राखून बोर्डर – गावसकर चषक जिंकण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. तर ही मालिका जिंकून आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांना अंतिम फेरी गाठता येईल. (Sydney Test)
सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, सॅम कोन्सटास, मार्नस लबुशेन, स्टिव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, बो वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्ष) मिचेल स्टार्क, नॅथन लायन व स्कॉट बोलंड
हेही पहा-
Join Our WhatsApp Community