Sydney Test : संघातील ‘या’ खेळाडूला व्हायचंय बदली कर्णधार, स्वत:ला म्हणवतो, ‘मि. फिक्सिट’

Sydney Test : या खेळाडूने बदली कर्णधार होण्याची इच्छा बोलून दाखवल्याचं बोललं जातंय.

78
Sydney Test : संघातील 'या' खेळाडूला व्हायचंय बदली कर्णधार, स्वत:ला म्हणवतो, ‘मि. फिक्सिट’
  • ऋजुता लुकतुके

सिडनी कसोटीपूर्वी मैदानावर भारतीय संघाच्या सुरू असलेल्या सरावापेक्षा मैदानाबाहेरच्या आणि ड्रेसिंग रुममधल्या बातम्यांनाच सध्या ऊत आला आहे. भारतीय संघात रोहीत शर्माचा उत्तराधिकारी शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे एवढं नक्की. गंभीरही सरावावेळी रोहीतपेक्षा जसप्रीत बुमराहशी चर्चा करताना जास्त दिसला. त्याचवेळी संघातील आणखी एका खेळाडूने अंतरिम कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केल्याचंही समजतंय. (Sydney Test)

निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच संघ निवडताना जसप्रीत बुमराहची उपकप्तान म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे पर्थ कसोटीत रोहित खेळला नाही तेव्हा बुमराहनेच संघाचं नेतृत्व केलं. पण, बुमराह व्यतिरिक्त संघातील आणखी एक खेळाडू अंतरिम कर्णधार होण्यासाठी इच्छुक असल्याचं समजतंय. इंडियन एक्सप्रेसने तशी बातमी केली आहे. ‘बुमराह व्यतिरिक्त संघातील आणखी एक खेळाडू या जबाबदारीसाठी उत्सुक आहे आणि हा खेळाडू स्वत:ला मि. फिक्सिट म्हणवतो. आता ज्या तथाकथित खराब परिस्थितीत भारतीय संघ आहे, त्यातून संघाला बाहेर काढण्याचा रामबाण उपाय आपल्याकडे आहे, असं या खेळाडूचं म्हणणं आहे,’ असं या बातमीत म्हटलं आहे. (Sydney Test)

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir: ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘इतक्या’ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन)

संघातील काही नवखे खेळाडूही कर्णधार होण्याची स्वप्न बघतायत. पण, ते योग्य नाही, असं या खेळाडूचं म्हणणं आहे. हा कर्णधार पदाची स्वप्न पाहणारा खेळाडू नेमका कोण आहे, ते बातमीत म्हटलेलं नाही. पण, हा खेळाडू संघातील ज्येष्ठ असल्याचं बातमीत म्हटलं आहे. पण, संघात रोहितच्या बरोबरीने विराट, जाडेजा, राहुल आणि बुमराह इतकेच ज्येष्ठ खेळाडू आहेत. तर रिषभ पंत दोन वर्षांच्या दुखापतीनंतर नुकताच परतलाय. (Sydney Test)

कप्तानीबद्दल बोलायचं झालं तर रोहीतची ही अखेरची कसोटी असणार हे जवळ जवळ निश्चित आहे. भारतीय संघ कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहोचला तरंच कदाचित यात बदल होऊ शकतो. पण, अंतिम फेरीही जूनमध्ये असल्यामुळे तोपर्यंत कर्णधार बदलण्याचा निर्णय होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह हाच या पदासाठी सध्या प्रबळ दावेदार आहे. (Sydney Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.