Sydney Test : रोहित शर्माला सिडनी कसोटीतून डच्चू, बुमराह संघाचा कर्णधार

Sydney Test : भारतीय संघ सराव करत असताना रोहित खूप उशिरा सरावात सहभागी झाला.

68
Sydney Test : रोहित शर्माला सिडनी कसोटीतून डच्चू, बुमराह संघाचा कर्णधार
  • ऋजुता लुकतुके

कर्णधार रोहित शर्माला शुक्रवारी सुरू होणाऱ्या सिडनी कसोटीसाठी संघातून डच्चू मिळाला आहे आणि जसप्रीत बुमराहच संघाचं नेतृत्व करणार असल्याचं खात्रीलायकरित्या समजतंय. टाईम्स समुहाने सध्या तशी बातमी दिली आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय संघाचा सराव सुरू असताना आणि गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेतही तसेच संकेत मिळत होते. रोहित ऐवजी पत्रकार परिषदेसाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आले आणि त्यांना जेव्हा रोहितच्या अनुपस्थितीविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं होतं. (Sydney Test)

(हेही वाचा – Cabinet Meeting : आधारच्या धर्तीवर आता पायाभूत सुविधा प्रकल्पाला सुद्धा युनिक आयडी…….! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

‘रोहितची तब्येत आणि तंदुरुस्ती चांगली आहे आणि कर्णधाराऐवजी मुख्य प्रशिक्षकाने पत्रकार परिषदेसाठी यावं यात अस्वाभाविक काही नाही,’ असं मोघम उत्तर गंभीर यांनी दिलं होतं. पण, रोहित कसोटी खेळणार की नाही यावर होकारात्मक ते बोलले नव्हते. त्यामुळे रोहित सिडनी कसोटी खेळणार की नाही, यावर सकाळपासून प्रश्नचिन्ह होतं. (Sydney Test)

(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या नावाने दिल्लीत कॉलेज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन)

त्यानंतर कसोटीपूर्वी भारतीय संघ सराव करत असताना रोहित दोन तास उशिरा सरावाच्या ठिकाणी आला आणि त्यानंतर तो नेट्सच्या कडेला बसला होता. त्याने प्रत्यक्ष सरावात भाग घेतला नाही. उलट विराट, शुभमन, यशस्वी हे फलंदाजीचा सराव करताना दिसले. गुरुवारी सकाळी गंभीर उपकर्णधार जसप्रीत बुमराहशी प्रदीर्घ चर्चा करताना दिसले होते. त्यानंतर हा निर्णय झाला असावा. फक्त रोहितच नाही तर चुकीचा फटका खेळून मोक्याच्या क्षणी बाद झालेल्या रिषभ पंतवरही चुकीची शिक्षा म्हणून संघाबाहेर बसण्याची वेळ येऊ शकते. त्याच्या ऐवजी ध्रुव जुरेल संघात येईल आणि आकाशदीप ऐवजी प्रसिध कृष्णाला संधी मिळेल अशी दाट शक्यता आहे. (Sydney Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.