-
ऋजुता लुकतुके
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आता मालिकेतील शेवटच्या सिडनी कसोटीची तयारी करत आहेत. आणि त्याचवेळी सिडनी क्रिकेट ग्राऊंडचे क्युरेटर ॲडम लुईस यांनी मीडियाला सिडनीच्या खेळपट्टीची माहिती दिली. ‘आता आमच्याकडे दोन दिवस आहेत. आणि कसोटीसाठी खेळपट्टी तयार करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे,’ असं लुईस सोशल मीडियावरील व्हीडिओत म्हणताना दिसतात. सिडनी क्रिकेट ग्राऊंडने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हीडिओ प्रसारित केला आहे. (Sydney Test)
(हेही वाचा- Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याप्रकरणी वरळीतून एक जण ताब्यात)
सिडनीतील हवामान सध्या उष्ण आहे. ‘सकाळीच आम्ही खेळपट्टीवरील कव्हर काढलं होतं. आणि खेळपट्टीवरील गवत ७ मिमीपर्यंत कमी केलं. थोडं पाणीही मारलं. आता खेळपट्टी चांगली दिसत आहे. आज रोलरही फिरवला आहे. आता उद्या आणखी एक रोलर फिरवू. त्यानंतर शुक्रवारी खेळपट्टी क्रिकेटसाठी तयार असेल,’ असं लुईस या व्हीडिओत सांगताना दिसतात. (Sydney Test)
A New Year’s Day update with SCG Curator, Adam Lewis 🏏#PinkTest pic.twitter.com/QfyZQ6Risd
— Sydney Cricket Ground (@scg) January 1, 2025
ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेत सध्या २-१ ने पुढे आहे. त्यामुळे ही कसोटी अनिर्णित जरी राहिली तरी बोर्डर – गावसकर चषकावर ऑसी संध पुन्हा एकदा कब्जा करेल. यापूर्वी २०१४ मध्ये त्यांनी हा चषक जिंकला होता. मधली १० वर्षं त्याचा ताबा भारताकडे होता. भारतीय संघाला चषक राखायचा असेल तर त्यांना सिडनी कसोटी जिंकावीच लागेल. (Sydney Test)
(हेही वाचा- Mumbai Police : मुंबई पोलिसांकडून नवीन वर्षाचे गिफ्ट; चोरीला गेलेले ५०० मोबाईल फोनचे मुळ मालकांना वितरण)
भारतीय संघाची सिडनीतील आकडेवारी मात्र फारशी चांगली नाही. १९४७ पासून भारतीय संघ इथं १३ कसोटी खेळला आहे. आणि यातील अवधी १ जिंकताना ५ गमावल्या आहेत. आणि ७ अनिर्णित राखल्या आहेत. बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली इथं एकमेव कसोटी भारताने जिंकली होती. (Sydney Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community