ख्रिस गेल एकमेव फलंदाज आहे ज्याने टी-20 विश्वचषकात दोन शतके झळकावली. 2007 साली गेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 57 चेंडूत 117 धावा केल्या. त्यानंतर त्याने 2016 ला इंग्लंडविरुद्ध केवळ 48 चेंडूत शतक ठोकले.
वेगवान शतक
2016 च्या टी-20 विश्वचषकात युनिव्हर्स बाॅस म्हणून ओळखल्या जाणा-या ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्ध 48 चेंडूत शतक पूर्ण केले होते, विश्वचषकात त्याचा हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडलेला नाही.
ऑस्ट्रेलियाला विश्वविक्रमाची संधी
यजमान ऑस्ट्रेलियाकडे सलग दुस-यांदा टी-20 विश्वविजेते होण्याची दुर्मिळ संधी चालून आली आहे. तर यात यशस्वी ठरले, तर अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरेल.
सर्वात वेगवान अर्धशतक
2007 साली पहिल्यात टी-20 विश्वचषकात युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकत अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. संपूर्ण क्रिकेट इतिहासातले हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. आजपर्यंत युवराजचा हा विक्रम कायम आहे.
सर्वात मोठा विजय धावांच्या बाबतीत
सर्वात मोठा विजय 2007 साली श्रीलंकेने नोंदवला होता. त्यांनी केनियाविरुद्ध तब्बल 172 धावांनी विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना, श्रीलंकेने 260 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात केनियाचा संघ अवघ्या 88 धावांत गारद झाला.
( हेही वाचा: T-20 विश्वचषकातील भारत – पाकिस्तान सामना होणार नाही? ‘हे’ आहे कारण )
श्रीलंकेने आतापर्यंत सर्वाधिक तीन वेळा टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. 2009, 2012 आणि 2014 साली श्रीलंकेने टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता. यापैकी 2014 साली भारताला नमवून ते विश्वविजेते ठरले होते.
सर्वाधिक सात विश्वचषक खेळणारे खेळाडू
- रोहित शर्मा (भारत)
- ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)
- ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडिज)
- शाकिब अल हसन (बांगलादेश)
- महमुदुल्लाह (बांगलादेश)
- मुशफिक्कुर रहीम (बांगलादेश)