T-20 World Cup: चार टॉप संघ आणि फ्लॉप कर्णधार!

140

2022 चा टी-20 विश्वचषक आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीचे चित्रही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे आता काही गोष्टींचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. रोहित शर्मा, केन विल्यमसन, जाॅस बटलर आणि बाबर आझम या चार कर्णधारांनी कल्पक नेतृत्वाच्या जोरावर आपापल्या संघांना उपांत्य फेरी गाठून दिली. मात्र, वैयक्तिक कामगिरीमध्ये ते सपशेल अपयशी ठरले. संपूर्ण स्पर्धेत यापैकी एकाही कर्णधाराला साधा दीडशे धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. बाबरने तर धावांचे अर्धशतकही गाठलेले नाही. त्यामुळे उपांत्य फेरी गाठूनही कर्णधारांचा फाॅर्म हा या चारही संघासाठी सध्या चिंतेचा विषय आहे. एक नजर उपांत्य फेरी गाठणा-या 4 टाॅप संघांच्या 4 फ्लाॅप कर्णधारांवर….

( हेही वाचा: T20 World Cup : सेमीफायनलपूर्वी भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी! )

केन विलियम्सन ( न्यूझिलंड)

  • डाव-4
  • धावा- 132
  • सरासरी-33.00
  • स्ट्राईक रेट- 118.92
  • सर्वाधिक- 61

जोस बटलर (इंग्लंड)

  • डाव- 4
  • धावा- 119
  • सरासरी-29.75
  • स्ट्राईक रेट-132.22
  • सर्वाधिक-73

रोहित शर्मा (भारत)

  • डाव- 5
  • धावा- 89
  • सरासरी-17.70
  • स्ट्राईक रेट-109.88
  • सर्वाधिक-53

बाबर आझम (पाकिस्तान) 

  • डाव- 5
  • धावा- 39
  • सरासरी-7.80
  • स्ट्राईक रेट-61.90
  • सर्वाधिक-25
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.