टी-20 विश्वचषकाचे अँथम साँग रिलीज! कधी होणार भारत-पाक सामना?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने या हायव्होल्टेज लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी)ने आगामी टी-20 विश्वचषकाचे अँथम साँग आणि एक टी-20 चषकाची प्रसिद्धी करणारा एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. आयसीसीने हा खास व्हिडिओ शेअर करुन विश्वचषकाची उत्सुकता आणखी वाढवली आहे. अ‍ॅनिमेटेड कार्टुनच्या स्वरुपातील या व्हिडिओत काही क्रिकेट चाहते आणि काही संघांचे कर्णधार आहेत.

हे चार देश आघाडीवर

टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि यूएईमध्ये सुरू होणार आहे. या विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबईत खेळवला जाणार आहे. बॉलिवूडचे संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅनिमेटेड व्हिडिओत जगभरातील तरुण टी-20 चाहते आणि क्रिकेट विश्वातील काही काही दिग्गज खेळाडू आहेत. व्हिडिओची सुरुवात जमैका येथील एका बीचवरुन होते. त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड, वेस्ट इंडिज या देशातील चाहते दाखवले आहेत. टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवण्याच्या शर्यतीत हे देश आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.

(हेही वाचाः ‘शिवसेना’ लय भारी, ‘खड्ड्यात’ गेली जबाबदारी! मुंबईकरांचे रोजचे हाल दाखवणारा व्हिडिओ)

कधी होणार भारत-पाक सामना?

भारतीय कर्णधार कोहलीसहित गतविजेत्या वेस्ट इंडिजचा कर्णधार केरन पोलार्ड, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि अफगाणिस्तानचा राशिद खान यांचाही समावेश आहे. विश्वचषकासाठी आयसीसीने दोन ग्रुप केले आहेत. ग्रुप-बी मध्ये भारताचा समावेश आहे. भारतासोबत या ग्रुपमध्ये कट्टर शत्रू पाकिस्तान देखील आहे. या दोन्ही देशांची लढत २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने या हायव्होल्टेज लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here