T-20 World Cup : के एल राहुलसाठी फलंदाजीची कुठली जागा चांगली?

T20 World Cup : के एल राहुलसमोर टी-२० संघात जागा मिळवण्याचं आव्हान आहे 

177
K L Rahul : लखनौ फ्रँचाईजी के एल राहुलला कायम ठेवण्याची शक्यता कमीच, नवीन कर्णधाराच्या शोधात
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या टी-२० विश्वचषकासाठीच्या (T-20 World Cup) संघाची वाट ही यंदा आयपीएलमधून जाणार आहे. म्हणजे आयपीएलमधील कामगिरी हा एक निकष असणार आहे भारतीय संघात जागा मिळवण्याचा. त्यामुळे अगदी ज्येष्ठ खेळाडूही सध्या चांगल्या कामगिरीसाठी उत्सुक आहेत. त्यातीलच एक आहे के एल राहुल (KL Rahul). लखनौ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants) संघाचा हा कर्णधार आणि यष्टीरक्षक भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक आहे. एकेकाळी भारतीय संघाचा तो सलामीवीर होता. रोहीतबरोबर तो सलामीला यायचा. आता आयपीएलमध्ये तो मधल्या फळीत खेळतोय. आणि यष्टीरक्षण करतोय. (T-20 World Cup)

(हेही वाचा- Israel Iran War: इस्रायल-इराण युद्धावर काय म्हणाले एलॉन मस्क ?)

लखनौ संघात क्विंटन डी कॉक आणि निकोलस पुरन सारखे जागतिक दर्जाचे यष्टीरक्षक आहेत. पण, भारतीय संघात स्थान मिळवायची आस असलेल्या राहुलला या अष्टपैलूत्वाचा फायदा कळतोय. कारण, भारतीय राष्ट्रीय संघात यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या तिघांची जागा पहिल्या तीन क्रमांकावर ठरलेली आहे. असं असताना राहुलला मधल्या फळीतच फलंदाजीची अपेक्षा ठेवता येईल. आणि त्यात यष्टीरक्षण ही आणखी एक भूमिका तो निभावू शकतो. (T-20 World Cup)

अशावेळी राहुलला क्रमांक ५ आणि ६ वरच लक्ष केंद्रीत करावं लागेल. या जागेवर आधीपासूनच शिवम दुबे, रिषभ पंत आणि रिंकू सिंग यांनी दावा सांगितला आहे. रिषभ पंतने दीड वर्ष तो क्रिकेटपासून दूर होता हे आपल्या फलंदाजीत जाणवू दिलेलं नाही. तर शिवम दुबे चेन्नईसाठी नियमितपणे चांगला शेवट करून देण्याची भूमिका पार पाडतोय. आणि रिंकू सिंगने आपला कणखरपणा याआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिला आहे. (T-20 World Cup)

(हेही वाचा- Rahul Shewale यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट)

त्यामुळे भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी के एल राहुलला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागणार हे नक्की. के एल राहुलची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर त्याने २०१८ मध्ये १५८ धावांचा स्ट्राईकरेट राखत ६५९ धावा केल्या होत्या. पण, त्यानंतर २०२० मध्ये त्याने ऑरेंज कॅप मिळवली. पण, त्याचा स्ट्राईकरेट १२९ वर आला. पाचव्या, सहाव्या क्रमांकावर खेळायचं झालं तर फिनिशर म्हणून कामगिरी पार पाडताना त्याला चांगल्या स्ट्राईक रेटची गरज लागणार. म्हणूनच लखनौच्या उर्वरित सामन्यांत राहुलला चांगला स्ट्राईकरेट राखण्यावर भर द्यावा लागणार आहे. (T-20 World Cup)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.