- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषक (T20 Champions Return Home) जिंकलेला भारतीय संघाची बार्बाडोसमधून अखेर सुटका झाली आणि संघ खास चार्टर्ड विमानाने भारतात यायला रवाना झाला आहे. गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजता हे विमान नवी दिल्ली विमानतळावर उतरले. थोड्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी रवाना होईल. हा कार्यक्रम आटोपल्यावर दुपारीच भारतीय संघ दिल्लीहून मुंबईत दाखल होईल. (T20 Champions Return Home)
इथं भारतीय संघाची खुल्या बेस्ट बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. २०११ च्या विश्वचषक विजयानंतरही अशीच मिरवणूक काढण्यात आली होती. मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडिअम (Marine Lines to Wankhede Stadium) अशा मिरवणुकीनंतर संध्याकाळी पाच वाजता वानखेडे स्टेडिअमवर भारतीय संघाचा सत्कार समारंभ होईल. पावसातही चाहते या कार्यक्रमाला नक्की प्रतिसाद देतील याची बीसीसीआयला (BCCI) खात्री आहे. (T20 Champions Return Home)
(हेही वाचा- Pune Zika Virus : झिकाच्या रुग्णांत वाढ, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यासाठी जारी केली नियमावली!)
कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ‘४ जुलै, संध्याकाळी पाच वाजता,’ असं म्हणत ट्विटरवर चाहत्यांना साद घातली आहे. सर्वांनी आवर्जून या, चषक घरी आलाय, असं म्हणायलाही तो विसरला नाही. (T20 Champions Return Home)
🇮🇳, we want to enjoy this special moment with all of you.
So let’s celebrate this win with a victory parade at Marine Drive & Wankhede on July 4th from 5:00pm onwards.
It’s coming home ❤️🏆
— Rohit Sharma (@ImRo45) July 3, 2024
बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनीही रोहित प्रमाणे ट्विट करून सत्कार समारंभाचा कार्यक्रम सांगितला आहे. ‘टी-२० विश्वचषकातील भारतीय संघाचा विजय साजरा करण्यासाठी होणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी तयार रहा. मरिन लाईन्स आणि वानखेडे स्टेडिअमवर (Marine Lines to Wankhede Stadium) संध्याकाळी पाच वाजल्यापासून नक्की या,’ असं म्हणत जय शाह यांनी २०११ च्या संघाचा बसमधील फोटोही ट्विट केला आहे. (T20 Champions Return Home)
🏆🇮🇳 Join us for the Victory Parade honouring Team India’s World Cup win! Head to Marine Drive and Wankhede Stadium on July 4th from 5:00 pm onwards to celebrate with us! Save the date! #TeamIndia #Champions @BCCI @IPL pic.twitter.com/pxJoI8mRST
— Jay Shah (@JayShah) July 3, 2024
बेरिल चक्रीवादळामुळे ३ दिवस बार्बाडोसला अडकलेला भारतीय संघ बुधवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वाचार वाजता भारतात येण्यासाठी निघाला आहे. बीसीसीआयने एअर इंडियाची चार्टर्ड विमान सेवा घेऊन संघाच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) निवासस्थानी भारतीय संघ पंतप्रधानांची भेट घेईल. त्यानंतर लगेचच मुंबईला रवाना होईल. (T20 Champions Return Home)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community