परंपरागत शत्रु असलेल्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली असून पाकिस्तानने भारताला प्रथम फलंदाजी करण्यास दिले आहे. पाकिस्तानी कर्णधाराने नाणेफेक जिकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. यानंतर सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही पक्षांच्या खेळाडुंनी मैदानात अभिवादन करतच हम सब साथ हैचा संदेश दिला. मात्र, पहिल्या पाच षटकात भारताला तीन धक्के बसले. रोहित शर्मा, के.एल. राहुल आणि सूर्यकुमार यांना पाकिस्तानच्या आफ्रिदीने आणि हसनने पॅव्हेलियन मध्ये पाठवले.
रोहित आणि राहुलचे विकेट
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना प्रत्येक क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच मानली जातात. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते. सामना सुरु झाल्यानंतर पहिल्याच षटकात रोहित शर्मा पायचित बाद झाला.आफ्रिदी याच्या चौथ्या चेंडुवर तो पायचित बाद झाला आणि भारताला पहिल्याच षटकात मोठा झटका बसला. त्यानंतर सलामीवीर के.एल. राहुल याच्या जोडीला कर्णधार विराट कोहली मैदानावर उतरला.
(हेही वाचाः शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, कुठल्याही क्षणी अटक)
आफ्रिदीची चमकदार कामगिरी
पाकिस्तानने दुसरे षटक जलदगती गोलंदाजाकडून टाकून घेण्याऐवजी फिरकीवीर इमाद यांच्या हाती चेंडू सोपवला होता. मात्र, पहिल्याच षटकात राहुलची विकेट गेल्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांचा आत्मविश्वास अधिक वाढला होता.मात्र, दुसरीकडे कर्णधार विराट कोहली याच्यावरील जबाबदारी अधिक वाढली होती, त्यामुळे के.एल. राहुल सोबत सावध बाजु लावत धावफलक हलता ठेवण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत करपात असतानाच सामन्याच्या तिसऱ्या आणि आफ्रिदीच्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर के.एल. राहुल हा त्रिफळाचित झाला. त्यानंतर आलेल्या सुर्य कुमार यष्टीरक्षकाकडे झेल देऊन पॅव्हेलियन मध्ये परतले.
सविस्तर वृत्त
Join Our WhatsApp Community