T20 WC, Ind vs Ire : भारताचा आयर्लंडवर मोठा विजय, खेळपट्टीवर मात्र होतेय टिका 

T20 WC, Ind vs Ire : अमेरिकेतील नसॉ काऊंटीची खेळपट्टी बाहेर बनवून इथं तयार बसवली आहे 

150
T20 WC, Ind vs Ire : भारताचा आयर्लंडवर मोठा विजय, खेळपट्टीवर मात्र होतेय टिका 
T20 WC, Ind vs Ire : भारताचा आयर्लंडवर मोठा विजय, खेळपट्टीवर मात्र होतेय टिका 
  • ऋजुता लुकतुके 

आयर्लंड विरुद्ध भारतीय संघाचा विजय (T20 WC, Ind vs Ire) तोपर्यंत जवळ जवळ निश्चित झाला होता. नवव्या षटकांत जोश लिटिलचा एक चेंडू रोहितच्या खांद्याला बसला आणि झेल उडाला. बॅकवर्ड पॉइंटला झेल उडाल्यामुळे आयरिश कर्णधार पॉल अर्लिंगने (Paul Earling) तिसऱ्यां पंचांकडे अपील केलं. पण, चेंडू रोहितच्या (rohit sharma) बॅटला नाही, तर खांद्याला लागल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर लागोपाठच्या दोन चेंडूंवर रोहितने षटकार खेचले. आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण, लिटिलच्या अनियमित उसळलेल्या चेंडूने आपलं काम केलंच. पुढच्याच षटकांत एक जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नांत रोहितचा (rohit sharma) हात दुखायला लागला. त्याने दुखापत अधिक चिघळू नये म्हणून नाबाद ५२ धावांवर दुखापतीमुळे माघार घेण्याचं ठरवलं.  (T20 WC, Ind vs Ire)

(हेही वाचा- Shivrajyabhishek Sohala : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड सजले!)

सामना संपल्यानंतर तो म्हणाला, ‘खांद्याला थोडी सूज आहे. तो ठिक होईल. न्यूयॉर्कच्या खेळपट्टीला आम्ही हळू हळू सरावतोय. इथं काही चेंडू थांबून येतायत, काही उसळतायत. खूपच गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी आहे. माझी तक्रार नाही. पण, जपून खेळावं लागेल. वेगळे डावपेच आखावे लागतील.’ (T20 WC, Ind vs Ire)

रोहित (rohit sharma) जपून बोलत होता. पण, ३७ चेंडूंच्या त्याच्या खेळीत चेंडूने चकवण्याचे अनेक प्रसंग त्याच्या वाट्याला आले. अमेरिकेत क्रिकेट रुजवण्याचा हा प्रयत्न असला तरी खेळपट्टीमुळे क्रिकेटपटूंचा हिरमोड झाला आहे. समालोचन कक्षात माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉन म्हणाला, ‘अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढवताय हे चांगलं आहे. मला ते आवडतंय. पण, विश्वचषकासारख्या स्पर्धेत इतकी हलक्या दर्जाची खेळपट्टी असावी हे स्वीकारणं अवघड जातंय.’ (T20 WC, Ind vs Ire)

भारताचा माजी कसोटीपटू वसिम जाफरनेही (Wasim Jaffer) खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केलीय. ‘कसोटीसारखी खेळपट्टी टी-२० सामन्याच्या वाट्याला आली आहे. अमेरिकन लोकांना टी-२०च्या नावाखाली कसोटी क्रिकेट विकायचं असेल तर ही खेळपट्टी उत्तम आहे, अशी खोचक प्रतिक्रिया वसिमने दिली आहे.’  (T20 WC, Ind vs Ire)

तर सोशल मीडियावरही या खेळपट्टीवर भरपूर चर्चा रंगत आहे. एका प्रेक्षकाने म्हटलंय की, ‘अमेरिकेत बेसबॉल खेळतात. आणि तिथे टप्पा न पाडता चेंडू बॅटरकडे का टाकतात हे आज खेळपट्टी पाहून समजलं.’  (T20 WC, Ind vs Ire)

या खरमरीत प्रतिक्रियांनंतर हिंदुस्थान पोस्टने मुंबईतील काही खेळपट्टी क्युरेटरशी या विषयावर चर्चा केली. मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी बनवणाऱ्या एका क्युरेटरने नाव न उघड करण्याच्या अटीवर आपलं मत व्यक्त केलं. ‘खेळपट्टी बाहेरून बनवून नसॉ काऊंटी मैदानात बसवली आहे. हे ऑस्ट्रेलियन तंत्रज्जान आहे. तिथे ते यशस्वीपणे राबवण्यात येतं. पण, अशा बनवलेल्या खेळपट्टीची वेगळी निगा राखावी लागते. ती पूर्ण तयार व्हायला वेळही द्यावा लागतो. तितका वेळ दिलाय का हा प्रश्न आहे. तेवढा वेळ दिलेला दिसत नाही. खेळपट्टीवरील उंचसखलपणा कमी करण्यासाठी अतिरिक्त रोलर फिरवण्याचीही गरज असते. पण, नवीन खेळपट्टीवर तो फिरवता येत नाही,’ असं या क्युरेटरचं मत पडलं. (T20 WC, Ind vs Ire)

(हेही वाचा- Lok Sabha results : भाजपाला ध्रुवीकरणाचा फटका)

शिवाय भारतीय लोकांना प्राईम टाईमला सामने दिसावेत यासाठी अमेरिकेत सामन्यांची वेळ ही सकाळची ठेवण्यात आली आहे. तेव्हा टळटळीत ऊन असतं. त्याचा खेळपट्टीवर विपरित परिणाम झाला आहे का, या प्रश्नावरही त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. ‘नेमकी खेळपट्टी कशी आहे, हे सांगणं तसं अवघड असेल. त्यासाठी ती प्रत्यक्ष पहावी लागेल. पण, उन्हाचा परिणाम नक्कीच होतो. तसा तो कसोटी क्रिकेटमध्येही होतो. रात्रीच्या वेळी दवाची शक्यता असते. ऊन हे खेळपट्टीच्या ऱ्हासाचं एक कारण असू शकेल. पण, नक्की सांगता येणार नाही.’  (T20 WC, Ind vs Ire)

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्येही अजून विश्वचषक स्पर्धेला प्रेक्षकही फारसे जमलेले नाहीत. अगदी बार्बाडोसमध्येही स्टेडिअम सुनं सुनं होतं. पण, भारताच्या सामन्याला निदान मैदानात गर्दी तरी होती.  (T20 WC, Ind vs Ire)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.