T20 WC, Ind vs Ire : भारताचा आयर्लंडवर दणक्यात विजय, रोहितच्या दुखापतीची चिंता 

T20 WC, Ind vs Ire : पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा ८ गडी आणि ४६ चेंडू राखून पराभव केला 

121
T20 WC, Ind vs Ire : भारताचा आयर्लंडवर दणक्यात विजय, रोहितच्या दुखापतीची चिंता 
T20 WC, Ind vs Ire : भारताचा आयर्लंडवर दणक्यात विजय, रोहितच्या दुखापतीची चिंता 
  • ऋजुता लुकतुके 

टी-२० विश्वचषकातील (T20 WC, Ind vs Ire) हा आठवा सामना होता. पण, आतापर्यंत फक्त एकाच सामन्यात शंभरची धावसंख्या निर्धारित २० षटकांत पार झाली आहे. उलट एका डावांत १० गडी बाद होण्याची वेळ मात्र किमान पाचदा आली आहे. अशा खेळपट्टीवर भारतीय संघाने मात्र आयर्लंडवर वर्चस्व गाजवलं. ८ गडी, ४६ चेंडू राखून आपला पहिला गटवार साखळी सामना जिंकला. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) ५२ धावा आणि हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) ३ तर जसप्रीत बुमराचे २ बळी हे भारतीय विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. पण, त्याचवेळी खेळपट्टीवरील अनियमित उसळीमुळे कर्णधार रोहितचा खांदा दुखावलाय. ती काळजी भारतीय संघाला नक्की जाणवतेय. (T20 WC, Ind vs Ire)

अन्यथा, अगदी नाणेफेकीपासून सगळ्या गोष्टी भारतीय संघाच्या मनासारख्याच घडल्या. रोहितने (Rohit Sharma) आयर्लंडला पहिली फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं. अर्शदीप, सिराज, बुमरा आणि हार्दिक (Hardik Pandya) या चौकडीने आयरिश आघाडी आणि मधली फळी कापून काढली. अर्शदीप काहीसा महागडा ठरला. पण, दुसऱ्याच षटकांत अँडी बॉलबर्नी (५) आणि पॉल स्टर्लिंग (२) अशा दोघांना बाद करत त्याने आयरिश सलामीवीर तंबूत धाडले. (T20 WC, Ind vs Ire)

(हेही वाचा- BMC : धोकादायक इमारती आणि संभाव्य दरड कोसळण्याच्या ठिकाणांवर तातडीने कार्यवाही )

त्यानंतर हार्दिकही जोरात होता. त्याने लॉरकन टकरचा त्रिफळा उडवला. तर कर्टिस कॅम्फरलाही त्याने पंतकडे झेल द्यायला भाग पाडलं. त्यानंतर जसप्रीत बुमराची (Jasprit Bumrah) जादूई षटकं पडली. ३ षटकांत फक्त ६ धावा देत त्याने दोन आयरिश फलंदाज बाद केले. यातील यॉर्करवर जोश लिटिलचा घेतलेला बळी तर अप्रतिम होता. जसप्रीतलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.  (T20 WC, Ind vs Ire)

हार्दिकनेही २७ धावांत ३ बळी मिळवले. तिघांच्या माऱ्यापुढे आयर्लंडची अवस्था ७ बाद ७४ झाली होती. पण, गॅरेथ डॅलनीने शेवटच्या चेंडूपर्यंत किल्ला लढवत २४ धावा केल्या. त्यामुळे आयरिश संघ निदान शंभरच्या जवळपास पोहोचू शकला. जोश लिटिलने १२ धावा करत त्याला साथ दिली. आयरिश संघात चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. आणि डॅलनीच्या खालोखाल सगळ्यात मोठा वाटा होता तो १५ अवांतर धावांचा.  (T20 WC, Ind vs Ire)

(हेही वाचा- Lok Sabha Election : उत्तर प्रदेशात भाजपाला जागा का कमी मिळाल्या? कॅप्टन रिझवी यांनी सांगितली कारणे..)

आयर्लंडचा संघ वीस षटकांत ९६ धावा करून बाद झाला. डॅलनी शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. भारतासाठी हे आव्हान तसं सोपंच होतं. पण, नसॉ काऊंटी मैदानात चेंडू अनियमित उसळी घेत होता. झपकन वळतही होता. त्यामुळे भारतीय फलंदाजांनाही जपून खेळावं लागत होतं. रोहित शर्माचा (Rohit Sharma) पहिल्याच षटकात स्लिपमध्ये एक झेल सुटला. पण, त्यानंतर रोहितने एक बाजू लावून धरत सुरेख अर्धशतक ठोकलं. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ४,००० धावांचा टप्पाही पार केला. पण, जोश लिटिलचा एक चेंडू खांद्याला लागून त्याला दुखापतही झाली आहे. ५२ धावांवर नाबाद असताना त्याने दुखापतीमुळे बाहेर जाण्याचा पर्याय स्वीकारला. (T20 WC, Ind vs Ire)

सामन्यानंतर पुरस्कार वितरणासाठी मात्र तो हजर होता. खांद्याला थोडी सूज आल्याचं त्याने सांगितलं. अखेर भारताने विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव असे दोन फलंदाज गमावत हा सामना जिंकला. (T20 WC, Ind vs Ire)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.