टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या विजयासह गेल्या १३ वर्षांपासूनचा आयसीसीच्या ट्रॉफीचा दुष्काळ रोहितसेनेने संपवला. टी-20 क्रिकेट वर्ल्डकप टीम इंडियाने दुसऱ्यांदा जिंकला आहे. 130 कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने आपला पेटारा उघडला आहे. विजेत्या टीमसाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 125 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. जय शाह (Jay Shah) यांनी टीम इंडियाचं अभिनंदन करत यांची माहिती ट्विटरवर दिली. (T20 World Cup)
(हेही वाचा – पावसाळी सहल बेतली जीवावर; Lonavala येथे धबधब्यातून एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून)
काय म्हणाले Jay Shah ?
आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) जिंकल्याबद्दल टीम इंडियासाठी १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे, असं जय शहा यांनी म्हटलं आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने अपवादात्मक प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केलं आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन, असंही जय शहा यांनी म्हटलं आहे. (T20 World Cup)
I am pleased to announce prize money of INR 125 Crores for Team India for winning the ICC Men’s T20 World Cup 2024. The team has showcased exceptional talent, determination, and sportsmanship throughout the tournament. Congratulations to all the players, coaches, and support… pic.twitter.com/KINRLSexsD
— Jay Shah (@JayShah) June 30, 2024
(हेही वाचा – General Manoj Pandey लष्करप्रमुख पदावरून सेवानिवृत्त)
आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२४ सुरू होण्याच्या वेळी बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकण्यासाठी २०.३६ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. (T20 World Cup)
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community