टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 गडी राखून झालेल्या दारूण, लाजीरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी गुरूवारी झालेल्या सामन्यावर टीका केली आहे. तर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर ज्यांची कामगिरी खराब आहे, अशा खेळाडूंना काढून टाका अशी मागणी केली आहे.
(हेही वाचा – बकरीच्या शरीरावर Twitter च्या एलॉन मस्कचं डोकं! काय आहे नेमका प्रकार?)
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI आता पूर्णपणे कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता वर्षभरात भारतीय संघात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वरीष्ठ खेळाडूंना टी-20 सामन्यामध्ये समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू लवकरच बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांच्यासाठी हा शेवटचा विश्वचषक असणार आहे. याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही हळूहळू संघातून वगळण्यात येणार आहे. अशातच दिनेश कार्तिक, आश्विन, विराट कोहली, रोहित शर्मा यांचा टी-20 सामन्यासाठी विचार करण्याची वेळ आली आहे. बीसीसीआयने गुरूवारी घेतलेल्या निर्णयामुळे या खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे.
हार्दिक पांड्या हा भावी कर्णधार?
इंग्लंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश होता. त्यानंतर त्याला प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिलासा दिला. पुढील टी-20 विश्वचषक आता दोन वर्षांनी होणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयला हार्दिक पांड्यामध्ये भावी कर्णधाराची झलक दिसत आहे. म्हणजेच पुढील टी-20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार हार्दिक असू शकतो हे स्पष्ट झाले आहे.
खेळाडूचा हा वैयक्तिक निर्णय असणार
असेही सांगितले जात आहे की, बीसीसीआय कोणालाही निवृत्त होण्यास सांगणार नाही. हा प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे. 2023 पर्यंतच्या पुढच्या टी-20 विश्वचषकाबद्दल सांगायचे झाले तर बहुतांश वरिष्ठ खेळाडू कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळताना दिसतील. तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला सेवानिवृत्तीची घोषणा करण्याची गरज नाही, असे बीसीसीआयने सांगितले. असे असतानाही मात्र पुढच्या वर्षी टी-20 मध्ये तुम्हाला बरेच सीनियर खेळाडू खेळताना दिसणार नाहीत.
Join Our WhatsApp Community