T20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटे Sold Out, ‘या’ तारखेला असणार महामुकाबला

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबरला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशांसह जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकीट विक्रिला सुरूवात होताच काही मिनिटांतच सर्व तिकीटे विकली गेली आहेत. आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात याविषयी माहिती देण्यात आली आहे.

( हेही वाचा : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी MSRDC उभारणार १५ पोलीस ठाणी)

भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली 

भारत पाकिस्तान सामना २३ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर असणार आहे. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेतच शिवाय स्टॅंडिंग रुमची तिकिटेही काही मिनिटातच विकली गेली आहेत. टी-२० विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार आहेत. संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहेत.

भारताचे सुरूवातीचे पाच सामने 

  • पहिला सामना २३ ऑक्टोबर भारत विरूद्ध पाकिस्तान
  • दुसरा सामना २७ ऑक्टोबर भारत विरूद्ध अ गटातील उपविजेता संघ
  • तिसरा सामना ३० ऑक्टोबर भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका
  • चौथा सामना २ नोव्हेंबर भारत विरूद्ध बांगलादेश
  • पाचवा सामना ६ नोव्हेंबर भारत विरूद्ध ब गटातील विजेता

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here