T20 World Cup 2022: ऐतिहासिक विजयानंतर झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानची काढली लाज

125

विश्वचषक स्पर्धेतील मोठ्या मॅचेस सुरु झाल्यापासून क्रिकेट फॅन्स आनंदात आहेत. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केली. तर गुरुवारी झालेल्या रोमांचक सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तानचा पराभव केला. तेव्हापासून सोशल मीडियावर पाकिस्तानच्या खेळाडूंची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. यामध्ये आता झिम्बाब्वेचे राष्ट्रपतीसुद्धा उतरले आहेत. त्यांनी सुद्धा पाकिस्तानची लाज काढली आहे.

झिम्बाब्वेने 8 बाद 130 धावा केल्या. वेस्ली मॅधेव्हेपर व क्रेग एर्व्हिन यांनी आक्रमक सुरुवात केली,परंतु पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. सिन विलियम्स याने 31 धावा केल्या. तर रायन बर्ल 10 व ब्रॅड एव्हान्स 19 धावा केल्या. पाकिस्तानच्या मोहम्मद वासीमने 4 आणि शाबाद खानने 3 विकेट्स घेतल्या. पाकिस्तान हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले होते. पण, मोहम्मद रिझवान 14 तर बाबार 4 धावांवर बाद झाले. त्यानंतर इफ्तिखार अहमद 5 व हैदर अली शून्य धावांवर बाद झाले. शान मसूद 44 धावांवर बाद झाल्यानंतरही मोहम्मद नवाजने संघर्ष सुरु ठेवला होता. पण तोही अखेरच्या षटकात बाद झाला आणि 1 चेंडूत 3 धावा हव्या असताना शाहिन आफ्रिदी रन आऊट झाला. पाकिस्तानला 8 बाद 129 धावा करता आल्या. सिकंदर रजाने 3 व ब्रॅड इव्हान्सने 2 विकेट्स घेतल्या.

( हेही वाचा: सदस्य नोंदणीसाठी शिंदे गटाची भन्नाट आयडिया; स्वयंचलित कॉलिंग यंत्रणा, फोन करताच मुख्यमंत्र्यांचा आवाज )

Mr.Bean प्रकरण काय आहे?

2016 सालातील प्रकरण आहे. पाकिस्तानी काॅमेडियन असिफ मुहम्मद, ज्यांना Mr. Pak Bean म्हणून ओळखले जाते, त्यांनी हरारे येथे खरा Mr.Bean ब्रिटीश अभिनेता रोवन एॅटकिन्सनचे यांनी नकल करुन विनोद सादर केले होते. त्यानंतर ट्वीटरवर वर एनगुगी चासुरा यांनी स्पष्ट केले, त्यांनी आम्हाला कृषी शो नावाच्या एका स्थानिक कार्यक्रमात ख-या Mr.Bean ऐवजी Pak Bean दिला. आम्हाला आमच्या कुटुंबासमोर लाज वाटली. या ट्वीटनुसार, पाकिस्तानने झिम्बाब्वेमधील एका कार्यक्रमाला फेक मिस्टर बिन पाठवला होता. यावरुन हा वाद सुरु झाला.

झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे ट्वीट 

झिम्बाब्वेचे राष्ट्रपती Emmerson Mnangangwa यांनी संघाला शुभेच्छा दिल्या. तसेच, पुढच्या वेळी ख-या मिस्टर बीनला पाठवा, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींचे हे ट्वीट विरेंद्र सेहवागने शेअर करत पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.