- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2024) बलाढ्य पाकिस्तानला धूळ चारल्यावर अमेरिकन संघासाठी अनेक दरवाजे उघडल्याची संघाची भावना आहे. कर्णधार मोनांक पटेलने तसं उघडपणे बोलूनही दाखवलं. अमेरिकन संघ (American team) आता १२ जूनला भारताशी दोन हात करणार आहे. या सामन्यातही जबाबदारीने खेळ केला तर अमेरिकन संघ चांगली छाप पाडू शकेल, असं पटेलला वाटतं. ‘संघाने मिळवलेल्या विजयावर मी खुश आहे. पाकिस्तान सारख्या संघाचा पहिल्यांदा सामना करत असताना अशाप्रकारे विजय मिळवणं ही समाधानाची गोष्ट आहे. आणि आता आमची नजर पुढील आव्हानावर असेल. त्या सामन्यासाठीही आम्ही तयार आहोत,’ असं मोनांक पटेल पाक विरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला. भारताचं नाव त्याने घेतलं नाही. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- Bangladeshi Women: मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; नऊ बांगलादेशी महिलांना अटक!)
एका विजयामुळे हुरळून जाता कामा नये याची कल्पनाही त्याला आहे. ‘आम्हाला आमच्या भावनांवर ताबा ठेवावा लागेल. भावनांमध्ये वाहून जाता कामा नये. तसंच आनंदही साजरा करता आला पाहिजे. म्हणजेच नवीन दिवस उजाडला की, आम्ही नवीन आव्हानासाठी तयार असलं पाहिजे. कालची कामगिरी तेव्हा जुनी असेल,’ असं पटेल आवर्जून म्हणाला. (T20 World Cup 2024)
खुद्द मोनांक पटेलने (Monak Patel) सलामीला येत ५० धावांची खेळी रचली. त्यामुळेच अमेरिकन संघाला १५९ धावांचा पाठलाग करणं शक्य झालं. अमेरिकेच्या सर्वच फलंदाजांनी किमान ३० धावा केल्या. पाकिस्तान सारख्या संघाचा पराभव केल्याचं महत्त्व अमेरिकन कर्णधाराला ठाऊक आहे. ‘अमेरिकेत क्रिकेट रुजवण्यासाठी संघाची कामगिरीच उपयोगी पडणार आहे. आशियाई ताकद असलेल्या पाकिस्तानला हरवण्याने अमेरिकन क्रिकेटसाठी बरंच काही बदलेल. अमेरिकन क्रिकेट आणि इथल्या क्रिकेटशी संबंधित समाजासाठी हा मोठा दिवस आहे,’ असं याविषयी बोलताना पटेल म्हणाला. (T20 World Cup 2024)
The American fairytale continues 🇺🇸😍
USA beat Pakistan in one of the biggest results in #T20WorldCup history and are ready to take on India next.
Get your tickets now ➡️ https://t.co/lafvvyC9f6 pic.twitter.com/lQb39FzHlo
— T20 World Cup (@T20WorldCup) June 6, 2024
अमेरिकन संघाने विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर बांगलादेश विरुद्ध मालिका खेळली होती. तिथेही त्यांनी एक विजय मिळवला होता. आता पाकिस्तानवरील विजय हा संघाने कर्तृत्वाने मिळवलेला आहे, हा नशिबाने मिळालेला विजय नाही, असं मोनांक पटेलने निक्षून सांगितलं. (T20 World Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community