- ऋजुता लुकतुके
वेस्ट इंडिजमध्ये आयसीसीची स्पर्धा झाली तर तिथे निकाल धक्कादायकच लागणार हे आता समीकरण होऊ पाहतंय. २००७ चा एकदिवसीय विश्वचषक आठवा. भारतीय संघ तर साखळीतच गारद झाला होता. शिवाय इतर संघांचीही वाताहत झाली होती. आताही वेस्ट इंडिजच्या जोडीने यजमान देश अमेरिका आहे. दोन्हीकडे धक्कादायक निकाल लागत आहेत. डॅलसमध्ये नवख्या अमेरिकेनं पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये हरवलं. आता प्रोव्हिडन्समध्ये झालेल्या सामन्यात चक्क न्यूझीलंडला अफगाणिस्तानने धक्का दिला आहे. अफगाणिस्तानने ज्या खेळपट्टीवर पहिली फलंदाजी करत १५९ धावा केल्या, तिथे किवी फलंदाजांना मिळून शतकंही ठोकता आलं नाही. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: लोकसभेवर निवडून आलेले राज्यातील ६ डॉक्टर कोण ? जाणून घ्या)
न्यूझीलंडचा अख्खा डाव ७४ धावांत गुंडाळला. ग्लेन फिलीप्स (Glenn Phillips) (१२) आणि मॅट हेन्री (Matt Henry) (१०) या दोघांच फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. बाकी १० धावा त्यांना अवांतर मिळाल्या. फझाहक फारुखीने १७ धावांत ४ बळी घेतले. तर आयपीएलमध्ये लय न सापडलेला रशिद खानही (Rashid Khan) ४ बळी घेऊन गेला. (T20 World Cup 2024)
Afghanistan put on a clinic with bat and ball against New Zealand to continue their winning momentum 🙌#T20WorldCup | #NZvAFG | 📝 https://t.co/v8noS59c1q pic.twitter.com/du3txa6GL0
— ICC (@ICC) June 8, 2024
डेवॉन कॉनवे, केन विल्यमसन, डेरिल मिचेल आणि ग्लेन फिलीप अशी तगदी फलंदाजांची फळी असतानाही न्यूझीलंडचा संघ कमाल दाखवू शकला नाही. खेळपट्टीवर चेंडू खाली रहात होते. त्यामुळे फलंदाजांना मनासारखी फटकेबाजी करता आली नाही. उलट चुकीचे फटके बसून फलंदाज बाद मात्र झाले. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- Narendra Modi Oath Ceremony: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे दिल्लीत आगमन)
याउलट अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमनुल्ला गुरबाझने (Rahmanullah Gurbaz) ५६ चेंडूंत ८० धावा करून या खेळपट्टीवर फलंदाजी कशी करायची याचा वस्तुपाठ घालून दिला. त्याने ५ षटकार आणि ५ चौकारांची आतषबाजी केली. तर त्याचा सलामीचा साथीदार इस्माईल झरदाननेही ४१ धावा केल्या. दोघांनी अफगाणिस्तानला १०३ धावांची सलामी करून दिली. बाकीचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे अफगाणिस्तानने ५ बाद १५९ धावांचीच मजल मारली. ही धावसंख्या सुरुवातीला न्यूझीलंडसाठी आवाक्यातली वाटत होती. पण, डाव सुरू झाल्यावर पहिल्या षटकापासून फलंदाज बाद होत गेले. (T20 World Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community