T20 World Cup 2024 : आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात सगळ्यांचं लक्ष भारताच्या संघ निवडीवर

भारतीय संघ मंगळवारी आपल्या टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुवात करत आहे.

101
T20 World Cup 2024 : आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात सगळ्यांचं लक्ष भारताच्या संघ निवडीवर
T20 World Cup 2024 : आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात सगळ्यांचं लक्ष भारताच्या संघ निवडीवर
  • ऋजुता लुकतुके

मंगळवारी न्यूयॉर्कच्या नसॉ काऊंटीच्या क्रिकेट मैदानावर भारत आणि आयर्लंडचे संघ आमने सामने येतील तेव्हा भारतीय क्रिकेट पंडित चर्चा करत असतील भारतीय संघाची निवड आणि फलंदाजीच्या क्रमावर. पण, खरं लक्ष असेल ते मैदानात बसवलेल्या आयात खेळपट्टीवर. ही खेळपट्टी ऑस्ट्रेलियात तयार झालीय. आणि मग इथं आणून बसवण्यात आलीय. इथं येण्यापूर्वीही ती अमेरिकेत फ्लोरिडा इथं काही महिने होती. नसॉ काऊंटी मैदानात अशा चार खेळपट्ट्या आहेत. आणि श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका लढतीत एका खेळपट्टीचं उघड झालेलं स्वरुप फारसं सुखावह नव्हतं.

त्यामुळे आताही भारतीय संघाची कामगिरी जशी महत्त्वाची तशीच महत्त्वाची असेल इथली खेळपट्टी. आणि भारतीय संघाला फलंदाजीच्या योग्य क्रमाबरोबरच खेळपट्टीची तोंडओळख आधी करून घ्यावी लागेल. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना त्याची कल्पना आहे. पण, त्यांचं लक्ष विजयावर आहे. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – Amit Shah : एनडीएने मित्र पक्षांना धाडला सांगावा! दिल्लीत राजकीय घडामोडी वाढल्या)

‘खेळपट्टी ही शेवटी खेळपट्टी असते. तुम्हाला तिच्याशी जुळवून घेऊन खेळावं लागतं. त्यालाच क्रिकेट म्हणतात. आम्ही या मैदानावर तीन सराव सत्र घेतली आहेत. प्रत्येक वेळी खेळपट्टी थोडी सुधारते. पण, जास्त विचार करण्यात अर्थ नाही. मैदानावर फक्त विजय महत्त्वाचा,’ असं द्रविड यांनी फक्त पत्रकारांनाच नाही तर संघातील खेळाडूंनाही सुनावल्याचं दिसतंय.

सलामीला कोणाला खेळवायचं हा प्रश्नही भारतीय संघासमोर आहे.

(हेही वाचा – Maldives President Mohamed Muizzu यांनी सलग तिसऱ्या विजयाबद्दल केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन!)

भारतीय संघाला माजी खेळाडूंकडून काही सल्ले मिळाले आहेत. पण, द्रविड यांनी हा प्रश्न टाळलाच. ‘आयपीएलमधील तीन यशस्वी सलामीवीर आमच्या संघात आहेत. संघ निवडतानाच आम्ही पर्याय राहतील असा संघ निवडला आहे. आताही सलामीसाठी आमच्याकडे पर्याय आहेत. आम्ही त्यातून दोघांची निवड करू,’ इतकंच उत्तर द्रविड यांनी दिलं.

पण, रोहित आणि विराट या अनुभवी जोडीला ते हात लावतील, अशी शक्यता कमीच दिसते. तसं झालं तर यशस्वीला बाहेर बसावं लागेल. कारण, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर मग अष्टपैलू खेळाडूंना खेळवण्याची संधी राहते. संघात शिवम दुबे, रवींद्र जा़डेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव असे अष्टपैलू फिरकीपटू आहेत. तर हार्दिक पांड्या हा अष्टपैलू तेज गोलंदाज आहे. या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश नक्की दिसतोय. आता यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतची निवड होते की, संजू सॅमसनची हे पाहावं लागेल.

दुसरीकडे भारतीय संघाचं पारडं या लढतीत जड असलं तरी पॉल स्टर्लिंग, जोश लिटिल, हॅरी टॅक्टर आणि अँडी बॉलबर्नी यांच्या आयरिश संघालाही हलकं लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. शिवाय जॉर्ड डॉकवेलची फिरकी भारतीय फलंदाज कसे खेळतात यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.