- ऋजुता लुकतुके
भारतीय वंशाचा अमेरिकन डावखुरा तेज गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने (Saurabh Netravalkar) यंदाच्या टी-२० विश्वचषकाचा (T20 World Cup 2024) पहिला आठवडा गाजवला आहे. पाकिस्तान विरुद्ध त्याने निर्धारित २० षटकांत दोन बळी मिळवले. नंतर सुपर ओव्हरमध्ये अचूक मारा करत त्याने फक्त १३ धावा दिल्या. त्यामुळेच अमेरिकेला पाकवर ५ धावांनी विजय मिळवणं शक्य झालं. पेशाने अभियंता असलेला आणि मुंबईकडून १८ वर्षांखालील क्रिकेट खेळलेला सौरभ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. त्याचे जुने व्हीडिओही चाहते शोधून काढत आहेत. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- Narendra Modi: पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण आशियातील ‘या’ पहिल्या महिलेला, कोण आहेत त्या? जाणून घ्या)
अमेरिका विरुद्ध पाकिस्तान सामन्यात निर्धारित २० षटकांत दोन्ही संघांनी प्रत्येकी १५९ धावा केल्यावर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. अमेरिकेनं पहिली फलंदाजी करत १८ धावा केल्या. पाकची फलंदाजी सुरू असताना मोनांक पटेलने चेंडू सौरभच्या हातात सोपवला. त्याने अचूक वेग आणि दिशा ठेवून गोलंदाजी केली. पाकला फक्त १३ धावा करता आल्या. अमेरिकेचा विजय झाला. या सामन्यानंतर सौरभ नेत्रावळकर (Saurabh Netravalkar) रातोरात हीरो झाला आहे. आणि जुन्या व्हीडिओवरून समजतंय की, तो क्रिकेट व्यतिरिक्त इतर अनेक बाबतीत हुशार आहे. कॉर्नेल विद्यापीठातून (Cornell University) त्याने संगणक शास्त्रात एमएस पदवी मिळवली आहे. तो ओरॅकल कंपनीत (Oracle Company) अभियंता म्हणून काम करतो. शिवाय संगीताचीही त्याला आवड आहे. (T20 World Cup 2024)
SAURABH NETRAVALKAR – THE MULTI TALENTED GUY! 🥶
If being a software engineer at Oracle, defeating Pakistan wasn’t enough, he has previously shared his videos on Instagram Playing Ukulele. 😄👌 pic.twitter.com/uIGWofSkPZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 6, 2024
सौरभ फावल्या वेळेत युकुलेले हे हवाईतील वाद्य वाजवतो. गिटार सारख्या दिसणाऱ्या या वाद्याचं त्याने शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतलं आहे. या व्हीडिओत तो ‘मन उधाण वाऱ्याचे,’ या मराठी गाण्यावर युकुलेले वाजवताना दिसतो आहे. हे गाणंही त्याने स्वत: म्हटलं आहे. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- Bihar Bird Sanctuarie: बिहारमधील ‘या’ २ पक्षी अभयारण्यांचा पाणथळ क्षेत्रांच्या जागतिक यादीत समावेश)
अभियांत्रिकी शिक्षणानंतर २२ व्या वर्षी त्याने क्रिकेट सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. आणि तिथे शनिवार, रविवारी होणाऱ्या टेनिसबॉल सामन्यांवर तो आपली क्रिकेटची भूक भागवत होता. पण, अचानक त्याला पुन्हा एकदा व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्याने चक्क या संधीचं सोनं करून दाखवलं आहे. (T20 World Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community