T20 World Cup 2024 : कमिन्सची सलग दोन सामन्यांत हॅट-ट्रीक, अंतिम सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या…टी-२० विश्वचषकातील नवीन विक्रम 

T20 World Cup 2024 : या टी-२० विश्वचषकात साजरे झालेले नवीन विक्रम पाहूया

417
T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकातील खेळपट्ट्यांवर फक्त ३ खेळपट्ट्या खेळण्यासाठी अयोग्य - आयसीसी
  • ऋजुता लुकतुके 

टी-२० विश्वचषकाचा (T20 World Cup 2024) हा नववा हंगाम आता संपला आहे. भारतीय संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तर दक्षिण आफ्रिकेला निकराच्या प्रयत्नांनंतरही पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी पराभव पत्करावा लागला. एक महिना चाललेली ही स्पर्धा रंगतदार झाली. अनेक लक्षात राहण्यासारख्या आठवणी खेळाडू आणि पाठीराख्यांना मिळाल्या. त्याचबरोबर नवीन विक्रमही रचले गेले.  (T20 World Cup 2024)

अशाच काही निवडक विक्रमांवर नजर टाकूया जे लक्षवेधी ठरले,

अपराजित संघांमध्ये अंतिम लढत 

अंतिम फेरीत पोहोचलेले दोन्ही संघ, भारत (India) व दक्षिण आफ्रिका (South Africa) हे तोपर्यंत स्पर्धेत अपराजित होते. स्पर्धा संपताना दोन्ही संघांनी सलग ८ विजयांचा टप्पा गाठला. भारतीय संघाने सलग ९ विजय मिळवले असते. पण, कॅनडा (Canada) विरुद्धचा गटवार साखळी सामना पावसात वाहून गेला. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Hathras Stampede : भोले बाबा कुठे गेले? शोधमोहिमेनंतर पोलीस म्हणाले…)

अंतिम सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या 

भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ बाद १७६ धावा केल्या. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम फेरीतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०२१ च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड विरुद्ध २ बाद १७२ धावा केल्या होत्या.  (T20 World Cup 2024)

रोहितचा शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना 

रोहित शर्मा (Rohit Sharma) अंतिम सामन्याच्या दिवशी ३७ वर्षं आणि ६० दिवसांचा होता. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकून देताना त्याने नवीन विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. टी-२० विश्वचषक जिंकणारा तो वयाने सगळ्यात ज्येष्ठ क्रिकेटपटू ठरलाय. रोहित (Rohit Sharma) आणि विराटने (Virat) विजेतेपदानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय (T20 World Cup 2024) सामन्यातून निवृत्ती जाहीर केली आहे

एकाच हंगामात सर्वाधिक बळी 

अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि अफगाणिस्तानचा फजलहक फारुखी यांनी संपूर्ण स्पर्धेत एकूण १७ बळी मिळवले. एका टी-२० विश्वचषकात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम या दोघांच्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) १६ बळी टिपले होते. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Assam Flood Situation : आसाममध्ये पूरस्थिती; गुजरातच्या अनेक गावांचा संपर्क तुटला)

बूम बूम बुमरा 

भारताचा आणि या घडीला जागतिक क्रिकेटमधील सगळ्यात भेदक असलेला जसप्रीत बुमराने (Jasprit Bumrah) या स्पर्धेतही मैदान गाजवलं. स्पर्धेत १५ बळी घेतले ते ८.३ च्या सरासरीने. टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील ही सगळ्यात किफायतशीर सरासरी आहे. तर बुमराने षटकामागे केवळ ४.१७ धावा दिल्या आहेत. तो ही सगळ्यात कमी धावगतीचा एक विक्रम आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या सुनील नरेनने (Sunil Narine) २०१४ मध्ये ४.६ च्या धावगतीने धावा दिल्या होत्या.

ख्रिस जॉर्डनचा जलवा 

इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) हा टी-२० प्रकारातील सगळ्यात प्रभावी गोलंदाज म्हणून ओळखला जातो. ते का, हे त्याने या स्पर्धेतही दाखवून दिलं. स्पर्धेतील त्याचा स्ट्राईक रेट ८.३ इतका होता. म्हणजे त्याच्या प्रत्येक बळीसाठी तो सरासरी ८.३ इतक्याच धावा देत होता. हा टी-२० विश्वचषक स्पर्धेतील विक्रम आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने (Jacques Kallis) २०१२ मध्ये ९.४ च्या स्ट्राईकरेटने बळी मिळवले होते. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Hawkers Free Railway Station : फेरीवाल्यांचा होतोय अतिरेक…)

लॉकी फर्ग्युसनला खेळणं कठीण 

सामना जरी पापुआ न्यू जिनी या नवख्या संघाविरुद्ध असला तरी टी-२० विश्वचषकाचा (T20 World Cup 2024) होता. या सामन्यात न्यूझीलंडचा तेज गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या (Lockie Ferguson) चार षटकांमध्ये पापुआ संघाच्या फलंदाजांना एकही धाव घेता आली नाही. हा अनोखा विक्रम आहे. टी-२० क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे की, गोलंदाजाच्या संपूर्ण कोट्यात एकही धाव निघाली नाही. वर फर्ग्युसनने तीन बळीही मिळवले. त्यामुळे टी-२० च्या इतिहासातील ही सगळ्यात किफायतशीर कामगिरी ठरली आहे.

सर्वाधिक चौकार 

२०२४ च्या स्पर्धेत एकूण १,४७८ चौकार ठोकले गेले. हा सर्वाधिक चौकारांसाठी नवीन विक्रम आहे. २०२१ च्या हंगामात १,३४९ चौकार मारले गेले होते. तो विक्रम यावेळी निकालात निघाला. तर षटकारांच्या बाबतीतही नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. या हंगामात एकूण ५१५ षटकार ठोकले गेले. २०२१ च्या ४०५ षटकारांच्या तुलनेत हा आकडा ११० नी जास्त आहे. (T20 World Cup 2024)

निकोलस पुरणने १७ षटकार 

वेस्ट इंडिजच्या निकोलस पुरणने (Nicholas Pooran) एका डावात १७ षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी ख्रिस गेलच्या नावावर हा विक्रम होता. त्याने १६ षटकार खेचले होते. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Mumbai Local Train : रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! मुसळधार पावसातही आता लोकल वेगाने धावणार)

कमिन्सच्या हॅट – ट्रीक 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) स्पर्धेत एक सोडून दोन हॅट – ट्रीक नोंदवल्या. आणि त्या ही लागोपाठच्या दोन सामन्यांमध्ये. अशी कामगिरी करणारा टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील तो पहिला गोलंदाज ठरलाय. (T20 World Cup 2024)

(टिप – ही आकडेवारी आयसीसीच्या वेबसाईटवरून घेतली आहे) 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.