T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमध्ये उद्घाटनाच्या सामन्याला रिकाम्या खुर्च्या

T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी रिकाम्या खुर्च्यी पाहून नेटकरी आले रंगात.

139
T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमध्ये उद्घाटनाच्या सामन्याला रिकाम्या खुर्च्या
  • ऋजुता लुकतुके

यंदाची टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धा ही अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या खेळवली जात आहे. पैकी विंडिजमधील स्पर्धेचा पहिला सामना यजमान वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू जिनी या संघांदरम्यान खेळवण्यात आला. पण, या सामन्याकडे प्रेक्षकांनी पूर्णपणे पाठ फिरवली. रविवारचा दिवस असताना आणि प्रोव्हिडन्स स्टेडिअमसारखं देशातील सगळ्यात मोठं मैदान असताना फक्त शंभर एक प्रेक्षक मैदानावर सामन्यासाठी हजर होते. (T20 World Cup 2024)

भारतात आणि परदेशातही प्रेक्षक संख्या पाहून लोकांमध्ये चांगलीच चर्चा इंटरनेटवर रंगली. ‘अमेरिकेत क्रिकेट सुरू करण्याचं सोडा. आधी वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेटला परत आणा,’ असं एका नेटकऱ्याने ट्विटरवर लिहिलं आहे. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – K Kavita यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ)

दरम्यान, वेस्ट इंडिजसाठी पापुआ न्यू जिनी विरुद्धचा हा सामना अजिबात सोपा नव्हता. पापुआ न्यू जिनी संघाने या स्पर्धेसाठी झालेल्या पात्रता फेरीत झिंबाब्वे संघाचा धक्कादायक पराभव केला होता. तोच फॉर्म त्यांनी विंडिज विरुद्धही दाखवून दिला. पहिली फलंदाजी करताना त्यांनी ८ बाद १३६ धावा केल्या. आणि त्यानंतर विंडिजला १३८ धावा करण्यासाठी २० व्या षटकापर्यंत रोखलं. अखेर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रोस्टन चेझने नाबाद ४२ धावा करत विंडिजला विजय मिळवून दिला. (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.