T20 World Cup 2024 : हार्दिकची नेट्समध्ये रोहित शर्माला गोलंदाजी

T20 World Cup 2024 : दोघांनी मुंबई इंडियन्सकडून खेळताना एकमेकांमध्ये आलेला दुरावा मागे सारला आहे.

128
T20 World Cup 2024 : हार्दिकची नेट्समध्ये रोहित शर्माला गोलंदाजी
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडून अचानक हार्दिक पांड्याकडे सोपवल्यावर दोन खेळाडूंमध्ये थोडासा बेबनाव झाल्याच्या बातम्या मागच्या महिनाभर येत होत्या. मुंबई इंडियन्स संघही जमून आला नाही आणि संघ म्हणून कामगिरी खालावल्याने गुण तालिकेत मुंबईचा संघ तळाला राहिला. त्यानंतर रोहित आणि हार्दिक हे खेळाडू आता भारतीय संघात (Indian team) पुन्हा एकत्र खेळत आहेत आणि यावेळी नेट्समधील वातावरण पाहिलं तर दोघांनी एकमेकांशी जुळवून घेतलेलं दिसत आहे. (T20 World Cup 2024)

हार्दिकसाठी आयपीएलचे दोन महिने खडतर होते. ते अपयश विसरून चांगली कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. आणि आता नेट्समध्येही रोहित आणि हार्दिक एकमेकांशी चांगल्या गप्पा मारताना दिसले. हार्दिकचे रोहितला गोलंदाजी करतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – ‘आकड्यांचा खेळ सुरूच राहील’, शेवटच्या मंत्रीपरिषदेमध्ये PM Narendra Modi यांचे ‘संकेत’)

भारतीय संघ मंगळवारी आपला पहिला सामना आयर्लंडबरोबर खेळणार आहे. अष्टपैलू तेज गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याचं संघातील स्थान निश्चित दिसतंय आणि त्यानंतर भारतीय संघ ९ जूनला न्यूयॉर्कमध्येच पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आयसीसी विजेतेपदांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने उतरला आहे. (T20 World Cup 2024)

२०१३ साली भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक जिंकला होता. त्यानंतर भारतीय संघाने (Indian team) एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चा चॅम्पियन्स करंडक या तीनही स्पर्धा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकल्या होत्या. त्यानंतर मात्र ११ वर्षांत दोनदा अंतिम फेरी गाठूनही भारतीय संघाला विजय मिळालेला नाही. (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.