-
ऋजुता लुकतुके
१ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील १५ पैकी ९ खेळाडू हे या आधी २०२२ मध्ये झालेला टी-२० विश्वचषकही (T20 World Cup 2024) खेळले आहेत. त्यामुळे हा भारतीय संघ हा अनुभवी आणि वयाने सरासरी ३२ वर्षांचा आहे. सध्या भारतात आयपीएल ही टी-२० लीग सुरू असल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंची कामगिरी या लीगमध्ये कशी आहे, याचा विचार तुमच्याही मनात नक्कीच आला असणार. त्यावरच एक नजर टाकूया,
रोहित शर्मा – भारतीय संघाचा हा कर्णधार मुंबई इंडियन्स संघाचाही स्टार सलामीवीर आहे. आणि मुंबईसाठी आतापर्यंत हा हंगाम वाईट गेला असला तरी संघाला चांगली सुरुवात करून देण्याचं काम रोहितने इमाने इतबारे केलं आहे. आतापर्यंत १० सामन्यांत त्याने ३१५ धावा केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट हा १६०.३० चा आहे. आणि सर्वोच्च धावसंख्या आहे १०५.
हार्दिक पांड्या – एकदिवसीय विश्वचषकातील दुखापतीपूर्वी हार्दिक हा भारतीय संघासाठी अगदी उपयुक्त अष्टपैलू खेळाडू होता. पण, आयपीएलमध्ये परिस्थिती थोडी बदललीय. त्याच्या कप्तानीवर टीका होतेय. आणि वैयक्तिक कामगिरीही ढासळलीय. त्यामुळे हार्दिकच्या संघातील समावेशावरही काहींनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. पण, एरवी तो भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणूनही ओळखला जातो. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या नावावर १९७ धावा जमा आहेत. तर ४ बळी त्याने मिळवले असले तरी षटकामागे ११ धावांचं मोल देत. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा – Ramesh Bais : समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवूया, राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन)
यशस्वी जयसवाल – या आयपीएलमध्ये यशस्वीची सुरुवात एकदम धिमी झाली होती. पण, चेन्नई विरुद्ध ५९ चेंडूंत शतक झळकावत त्याने आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे.
विराट कोहली – भारतीय संघाच्या निवडीपूर्वी आयपीएलमधील विराट कोहलीच्या स्ट्राईकरेटविषयी बरीच उलट सुलट चर्चा झाली आहे. पण, एकूण कामगिरी पाहिली तर त्याच्या नावावर १० सामन्यांमध्ये ५०० धावा जमा आहेत. आणि त्याचा स्ट्राईक रेटही १५५ इतका आहे.
सूर्यकुमार यादव – सूर्यकुमार दुखापतीनंतर स्पर्धेत परतला आहे. सुरुवातीचे दोन सामने तो खेळूही शकला नव्हता. पण, त्यानंतर ३ महिने तो क्रिकेटपासून दूर होता हे विसरायला लावणारे काही डाव तो खेळला आहे. पंजाब किंग्ज विरुद्धची ७८ धावांची खेळी आणि १९ चेंडूंत केलेलं अर्धशतक या दोन यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम खेळींपैकी दोन खेळी होत्या. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा – Maharashtra Day 2024 : दिवस एक आणि वैशिष्ट्ये अनेक…जय महाराष्ट्र!)
रिषभ पंत – रिषभ पंतचं करावं इतकं कौतुक कमीच आहे. रस्ते अपघातात झालेल्या मोठ्या दुखापतींनंतर पठ्ठ्या मैदानावर पुन्हा उभा ठाकला आहे. आणि त्यातही १० सामन्यांत त्याने ३७१ धावा केल्या आहेत त्या १६० च्या स्ट्राईक रेटने. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं अशक्यच होतं.
संजू सॅमसन – राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि आघाडीच्या फळीतील फलंदाज म्हणून संजू सॅमसनने मोठी भूमिका बजावली आहे. १० सामन्यांत त्याच्या नावावर ३८१ धावा जमा आहेत त्या १६१ धावांच्या स्ट्राईकरेटने. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.
शिवम दुबे – शिवम दुबे खरंतर अष्टपैलू आहे. पण, त्याला गोलंदाजीची संधी मिळालेली नाही. पण, तळाला येऊन हमखास फटकेबाजी करण्याचं कौशल्य त्याने वारंवार दाखवून दिलं आहे. ९ सामन्यांत त्याच्या धावा आहेत ३५०, सरासरी आहे ५८ आणि स्ट्राईकरेट आहे १७२ धावांचा. डावखुऱ्या फलंदाजाकडे दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा – Muslims : आरजू, हिना, सायमा यांची ‘घरवापसी’ जय श्रीराम म्हणत हलाल आणि बुरख्याचा केला निषेध )
रवींद्र जाडेजा – रवींद्र जाडेजा आतापर्यंत त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. पण, तो संघाला गरज असताना हुकमी कामगिरी करणारा आणि गोलंदाजीत बळी मिळवणारा अष्टपैलू खेळाडू आहे. तेच त्याने ५७ धावा करताना दाखवून दिलं आहे. शिवाय तो चपळ क्षेत्ररक्षकही आहे. ९ सामन्यांत त्याने आतापर्यंत १९७ धावा आणि ५ बळी मिळवले आहेत.
अक्षर पटेल – किफायतशीर गोलंदाजी आणि अचानक फलंदाजाला बुचकाळ्यात टाकणारे चेंडू टाकून बाद करणं ही त्याची खासियत आहे. त्या जोरावर त्याने स्पर्धेत आतापर्यंत ९ बळी मिळवले आहेत. आणि फलंदाजीतही चमकदार कामगिरी करताना १७० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक अर्धशतकही आहे. (T20 World Cup 2024)
कुलदीप यादव – कुलदीप यादवच्या गोलंदाजीत गेल्या काही वर्षांत चांगलाच बदल झाला आहे. सध्या तो भारतातील एक यशस्वी आणि भरवशाचा फिरकीपटू आहे. त्याचंच प्रात्यक्षिक दाखवताना त्याने आतापर्यंत १२ बळी मिळवले आहेत. आणि अलीकडेच आपल्या बॅटची जादूही काही सामन्यातून दाखवून दिली आहे. ताजी कामगिरी ही कोलकाता विरुद्ध केलेल्या ३५ धावा.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उत्तर मुंबई मतदारसंघातून कॉंग्रेसच्या भूषण पाटलांना उमेदवारी)
यजुवेंद्र चहल – यजुवेंद्र चहल आतापर्यंतचा या स्पर्धेतला सगळ्यात यशस्वी गोलंदाज आणि पर्पल कॅप नावावर केलेला लेगस्पिनर आहे. त्याच्या नावावर सर्वाधिक १३ बळी आहेत. आणि अलीकडेच आयपीएलमध्ये २०० बळींचा टप्पा त्याने पार केला आहे.
अर्शदीप सिंग – अर्शदीप सिंग हा स्वत:च्या गोलंदाजीवर मेहनत घेणारा युवा भारतीय तेज गोलंदाज आहे. सामन्यागणिक त्याच्या कामगिरीत सुधारणा दिसून आली आहे. आणि आतापर्यंत त्याने स्पर्धेत १२ बळी मिळवले आहेत. सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध घेतलेल्या ४ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
जसप्रीत बुमराह – जसप्रीत भारताचा सगळ्यात अचूक आणि भेदक गोलंदाज आहे हे वेगळं सांगायला नको. पण, त्यातही यंदाची आयपीएल त्याला विशेष लाभदायी ठरली आहे. १४ बळींसह पर्पल कॅप सध्या त्याच्याकडेच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हंगामात सर्वच गोलंदाजांची धुलाई होत असताना जसप्रीतचा स्ट्राईकरेट आहे अवघा ६.०६ धावांचा. त्याच्या गोलंदाजीवर फक्त दोन षटकार ठोकले गेले आहेत. (T20 World Cup 2024)
मोहम्मद सिराज – मोहम्मद शामी उपलब्ध नसल्यामुळे सिराजचा समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, एरवी या हंगामात त्याची कामगिरी अगदीच साधारण आहे. शिवाय त्याच्या गोलंदाजीवर धावाही बऱ्याच निघाल्या. अखेर त्याला एका सामन्यात बाहेरही बसवण्यात आलं. पण, अनुभव आणि आधीची कामगिरी या जोरावर त्याने संघात स्थान मिळवलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community