- ऋजुता लुकतुके
आगामी टी-२० विश्वचषक १ जूनला सुरू होणार आहे. आणि यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सामना ९ जूनला न्यूयॉर्क इथं होणार आहे. खास या स्पर्धेसाठी न्यू आयलंड इथं नसॉ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअम बांधण्यात येत आहे. तिथेच हा सामना होणार आहे.
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तपणे होणाऱ्या या स्पर्धेत ९ स्टेडिअमवर मिळून एकूण ५५ सामने रंगणार आहेत. या ५५ सामन्यांपैकी ४१ सामने वेस्ट इंडिजमध्ये होतील. उपान्त्य फेरीचे दोन सामने गयाना आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो इथं होतील. तर अंतिम सामना २९ जूनला बार्बाडोसला होईल.
Get ready for the ultimate cricket carnival in the West Indies and the USA 🥁
Unveiling the fixtures for the ICC Men’s T20 World Cup 2024 🗓️ 🤩#T20WorldCup | Details 👇
— ICC (@ICC) January 5, 2024
स्पर्धेचा पहिला सामना १ जूनला यजमान अमेरिका आणि शेजारी देश कॅनडा यांच्यात होईल. स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांसाठी २० संघांची विभागणी चार गटांत करण्यात आली आहे. यात भारताचा समावेश पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड यांच्यासह अ गटात झाला आहे.
(हेही वाचा – Veer Savarkar : प्रारंभ ‘समाजक्रांती पर्वा’चा)
तर ब गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड आणि ओमान हे संघ असतील. क गटात न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, युगांडा, अफगाणिस्तान, पापुआ न्यू जिनी हे संघ आहेत. ड गटात द आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि नेपाळ हे संघ आहेत. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ सुपर सिक्समध्ये जातील. आणि सुपर सिक्स सामन्यांनंतर बाद फेरीचे चार संघ निवडण्यात येतील.
न्यूयॉर्क, डॅलस आणि मायामी या तीन अमेरिकन शहरांमध्ये अमेरिकेतील सामने रंगणार आहेत. आणि विशेष म्हणजे भारताचे सामने याच तीन शहरांत होणार आहेत. भारताच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ५ जूनला आयर्लंड विरुद्धच्या सामन्याने होईल.
📢 Announced!
Take a look at #TeamIndia‘s group stage fixtures for the upcoming ICC Men’s T20 World Cup 2024 👌👌
India will play all their group matches in the USA 🇺🇸#T20WorldCup pic.twitter.com/zv1xrqr0VZ
— BCCI (@BCCI) January 5, 2024
भारतीय संघाचं अ गटातील साखळीवार वेळापत्रक
भारत वि आयर्लंड – ५ जून
भारत वि. पाकिस्तान – ९ जून
भारत वि. अमेरिका – १२ जून
भारत वि. कॅनडा – १५ जून
भारताचे पहिले तीन सामने न्यूयॉर्कमध्ये तर चौथा सामना फ्लोरिडाला होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community