T20 world Cup 2024 : भारताने विश्वचषक जिंकला; पण, स्टार स्पोर्ट्सचं मोठं नुकसान

T20 world Cup 2024 : अधिकृत टीव्ही प्रसारक स्टार स्पोर्ट्सने आयसीसीकडे काही सवलती मागितल्या आहेत.

173
T20 world Cup 2024 : भारताने विश्वचषक जिंकला; पण, स्टार स्पोर्ट्सचं मोठं नुकसान
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषक २०२४ (T20 world Cup 2024) स्पर्धा यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत पार पडली. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा जिंकली असली तरी भारताचे सामने सोडले तर इतर सामन्यांना फारशी गर्दी नव्हती. शिवाय सामनेही काही वेळा १० षटकांच्या आत संपले. त्याचा फटका अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्स वाहिनीला बसला आहे. त्याचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आता त्यांनी आयसीसीकडे सवलत मागितली आहे.

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेला ही विश्वचषक स्पर्धा भारतीय चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरली, पण सर्वांना त्याचा फायदा झाला नाही. आता एक अपील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपर्यंत पोहोचले आहे, ज्यामध्ये १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ८३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे असं स्टार स्पोर्ट्सने म्हटलं आहे.

(हेही वाचा – शत्रूच्या Submarines शोधण्यासाठी भारत आणणार ‘सोनोबॉय’)

स्टार स्पोर्ट्ससाठी ही स्पर्धा अजिबात चांगली गेली नाही. आयसीसी आणि स्टार यांच्यातील ३ अब्ज डॉलरचा करार अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कपपासून लागू झाला होता. ‘क्रिकबझ’ च्या एका अहवालानुसार, स्टार स्पोर्ट्स विविध कारणांमुळे स्पर्धेच्या एकूण मूल्यांकनावर सूट देण्याची मागणी करत आहे.

अहवालानुसार, स्टारने आयसीसीला दोन पत्रे लिहिली आणि गेल्या महिन्यात कोलंबो येथे झालेल्या वार्षिक परिषदेत या मुद्द्यावर चर्चा केली. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनीही या प्रकरणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, अंतिम निर्णय बोर्डावर अवलंबून असेल. (T20 world Cup 2024)

(हेही वाचा – Dahihandi 2024 : विक्रोळीत जय जवान पथकाचे ९ थर; एकावर एक ४ एक्के)

विविध कारणांमुळे स्टार वर्ल्ड कपमध्ये १०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८३० कोटी रुपये) पेक्षा जास्त सूट मागत आहेत. ही सूट देण्याची मागणी करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे फ्लोरिडामध्ये भारत आणि कॅनडा यांच्यातील रद्द झालेला सामना असल्याचे सांगितले जात आहे.

भारत-कॅनडा व्यतिरिक्त, इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, अमेरिका विरुद्ध आयर्लंड आणि श्रीलंका विरुद्ध नेपाळ यासारखे काही सामने देखील रद्द करण्यात आले. त्यामुळे आता स्टार आयसीसीला कितपत पटवून देण्यात यशस्वी होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एवढेच नाही तर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील झटपट संपलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यावरही स्टार स्पोर्ट्सने बोट दाखवलं आहे. जिथे अफगाणिस्तान ५६ धावांवर सर्वबाद झाला आणि त्यानंतर अवघ्या ९ षटकात लक्ष्य गाठून आफ्रिकेने विजय मिळवला. (T20 world Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.