- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने गेल्या महिन्यात टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंचं मायदेशात जंगी स्वागत केलं. आणि त्याचबरोबर खेळाडूंना १२५ कोटी रुपयांचं इनामही जाहीर केलं. २९ जूनला झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा चुरशीच्या लढतीत ७ धावांनी पराभव केला आणि विजेतेपद पटकावलं. आता मिळणाऱ्या बक्षीसाच्या रकमेत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची हिस्सेदारी आहे. हे पैसे कसे विभागले जाणार आहेत ते बघूया. (T20 World Cup 2024)
यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि यजुवेंद्र चहल हे तीन खेळाडू स्पर्धेत एकही सामना खेळले नाहीत. त्यांना प्रत्येकी ५ कोटी रुपये मिळणार आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हा विजय मिळवला. त्यांनाही ५ कोटी रुपये मिळणार असल्याचं इंडियन एक्सप्रेसमधील बातमीत म्हटलं आहे. तर द्रविड यांचे सहकारी गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे, फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड व क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी दिलिप यांना प्रत्येकी अडीच कोटी रुपये मिळणार आहेत. (T20 World Cup 2024)
𝙈𝙪𝙢𝙗𝙖𝙞 𝙙𝙞𝙙 𝙣𝙤𝙩 𝙙𝙞𝙨𝙖𝙥𝙥𝙤𝙞𝙣𝙩, 𝙈𝙪𝙢𝙗𝙖𝙞 𝙬𝙖𝙨 𝙩𝙝𝙚 𝙗𝙚𝙨𝙩 ❤️
Ride the surreal wave of happiness in Mumbai with #TeamIndia Vice-captain Hardik Pandya 👌👌#T20WorldCup | #Champions | @hardikpandya7 pic.twitter.com/y4fZWcN1F9
— BCCI (@BCCI) July 6, 2024
(हेही वाचा – Narendra Modi Russia Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉस्कोमध्ये स्वागत; पुतीन यांच्यासोबत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा)
संघाबरोबर गेलेले थ्रोडाऊन तज्ज्ञ, मालीशवाले आणि फीजिओ यांनाही प्रत्येकी २ कोटी रुपये मिळणार आहेत. संघाबरोबर असलेले राखीव खेळाडू शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान आणि खलिल अहमद यांच्यासह निवड समितीच्या सदस्यांना प्रत्येकी १ कोटी रुपये मिळणार आहेत. पैशांचं हे वाटप पुन्हा एकदा समजून घेऊया, (T20 World Cup 2024)
रुपये ५ कोटी प्रत्येकी – १५ खेळाडू व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड
रुपये २.५ कोटी प्रत्येकी – फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातील प्रशिक्षक
रुपये २ कोटी प्रत्येकी – थ्रोडाऊन, मालीश व कंडिशनिंग प्रशिक्षक
रुपये १ कोटी प्रत्येकी – राखीव खेळाडू व निवड समितीचे सदस्य
याशिवाय विंडिज दौऱ्यावर गेलेले बीसीसीआयचे पदाधिकारी व व्हिडिओ तज्ज्ञ यांनाही बक्षिसातील हिस्सेदारी मिळणार आहे. (T20 World Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community