टी-२० प्रकारातील विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. त्यासाठी नेपाळ आणि ओमानचे संघ पात्र ठरले आहेत.आशियाई स्तरावर झालेल्या पात्रता फेरीत मिळवलेल्या विजयानंतर नेपाळ आणि ओमान या संघांनी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेत स्थान मिळवलं आहे. नेपाळची राजधानी काठमांडू इथं ही पात्रता स्पर्धा सुरू आहे. आणि तिच्या अंतिम फेरीत पोहोचलेले हो दोन संघ आता मुख्य स्पर्धेत खेळणार आहेत. (T20 World Cup 2024)
पात्रता स्पर्धेच्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात ओमानने बहारिनचा १० गडी राखून पराभव केला. तर नेपाळने दुसऱ्या उपान्त्य सामन्यात संयुक्त अरब अमिराती संघाचा ८ गडी राखून पराभव केला. ओमानने तिसऱ्यांदा वर्ल्ड टी-२० स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. यापूर्वी २०१६ आणि २०२१ मध्ये त्यांनी मुख्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण, सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच त्यांना गाशा गुंडाळावा लागला. (T20 World Cup 2024)
NEPAL HAVE QUALIFIED FOR THE T20 WORLD CUP 2024…!!!!!
– What a Historic Moment for Nepal Cricket and fans. pic.twitter.com/CW7c7VggOL
— CricketMAN2 (@ImTanujSingh) November 3, 2023
(हेही वाचा :Onion Prices : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी वर्गाची चिंता वाढली)
दुसरीकडे नेपाळसाठी वर्ल्ड टी-२० खेळण्याची ही दुसरी खेप असेल. यापूर्वी २०१४ मध्ये ते ही स्पर्धा खेळले होते. पण, पहिल्या फेरीच्या पुढे जाऊ शकले नव्हते.वर्ल्ड टी-२० स्पर्धेत २० देश खेळणार आहेत. आयसीसी क्रमवारीतील पहिले ८ संघ आपोआप या स्पर्धेसाठी पात्र ठरतात. आशियाई पात्रता फेरी पार पडल्यानंतर एकूण १८ संघांची निवड झाली आहे. उर्वरित दोन संघ आफ्रिकन पात्रता स्पर्धेत ठरतील.
वर्ल्ड टी-२० स्पर्धेसाठी पात्र ठरलेले संघ
यजमान – वेस्ट इंडिज व अमेरिका
२०२२ च्या स्पर्धेतील ८ संघ – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड (गतविजेते), भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका
आयसीसी क्रमवारीतील पुढचे आघाडीचे देश – अफगाणिस्तान, बांगलादेश
युरोपीयन पात्रता स्पर्धा – आयर्लंड, स्कॉटलंड
इस्ट एशिया पॅसिफिक पात्रता स्पर्धा – पापुआ न्यू जिनी
अमेरिकन पात्रता स्पर्धा – कॅनडा
आशिया पात्रता स्पर्धा – नेपाळ, ओमान
आफ्रिकन पात्रता स्पर्धा – निर्णय बाकी
हेही पहा –
Join Our WhatsApp Community